भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी (2 ऑगस्ट) आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे खेळवली जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने 3-0 ने विजय मिळवला. एकदिवसीय मालिकेदरम्यान भारत पुन्हा एकदा श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्यासाठी मैदानात उतरेल. संघाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल.
रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे खेळाडू तब्बल आठ महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहेत. भारतीय संघाने शेवटची वनडे मालिका (दक्षिण आफ्रिका) डिसेंबर 2023 मध्ये खेळली होती. अमेरिकेत झालेल्या टी20 विश्वचषकादरम्यान पंतने भारतीय संघात पुनरागमन केले.रिषभ पंतने 2022 मध्ये भारतासाठी एकदिवसीय सामना खेळला होता, त्यानंतर तो कार अपघातात जखमी झाला होता आणि तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला होता.
भारतीय संघातील दोन खेळाडूंची करिअर मधील सर्वोत्तम कामगिरी श्रीलंकेविरुद्ध आहे. ते दोन खेळाडू आणखी कोणी नसून विराट कोहली आणि मोहम्मद सिराज आहे. विराट कोहली आपल्या करिअर मध्ये सर्वाधिक धावा श्रीलंकेविरुद्ध केल्या आहेत. त्याने 51 डावात 2594 धावा केल्या आहेत. तर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्ध 6 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत. आश्या स्थितीत या मालिकेत कोहली आणि सिराजच्या कामगिरीवर सर्वाचे नजर राहणार आहे.
वनडे मालिकेत भारताला श्रीलंकेकडून आणखी आव्हानाची अपेक्षा आहे. 2014 पासून, भारताने 25 पैकी 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचा पराभव केला आहे. श्रीलंकेला केवळ चार एकदिवसीय सामने जिंकता आले आहेत. टी20 मालिकेतही श्रीलंकेची कामगिरी अत्यंत खराब होती. मालिकेतील पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात विजयाच्या अगदी जवळ येऊनही संघाला पराभव पत्करावा लागला. आता श्रीलंकेला भारताला आव्हान द्यायचे असेल तर दमदार कामगिरी करावी लागेल. टीम इंडियामध्ये अनेक प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन झाल्याने संघ पूर्वीपेक्षा मजबूत दिसत आहे. हेही तितकचं खरं आहे.
हेही वाचा-
कोलंबोमध्ये येणार ‘विराट’वादळ; कोहलीची या स्टेडियममधील आकडेवारी जाणून व्हाल थक्क!
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेतच पावासाचं सावट? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोलंबोमधील हवामान कसे असेल
मोठी बातमी! ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूचा पॅरिसमध्ये कार अपघात, कुटुंबीयही होते सोबत