---Advertisement---

मोहम्मद सिराजच्या केसांवरून युझवेंद्र चहलने उडवली खिल्ली; म्हणाला, ‘असं वाटतंय, गवत सुखलंय आणि…’

On: सोमवार, फेब्रुवारी 28, 2022 5:52 PM
Yuzvendra-Chahal-And-Mohammed-Siraj-And-Shreyas-Iyer
---Advertisement---

भारतीय संघाने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत श्रीलंकेला (India vs Sri Lanka) पराभूत करत मालिका खिशात घातली. या तिन्ही सामन्यात भारताचा जबरदस्त फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) अर्धशतक ठोकले. तसेच या मालिकेसाठी त्याला मालिकावीर म्हणूनही गौरवण्यात आले. तिसऱ्या सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला. यानंतर भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) चहल टीव्हीवर श्रेयसची मुलाखत घेतली. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही (Mohammed Siraj) गेस्ट अपीअरन्स दिला होता. यादरम्यान चहल आणि श्रेयसने सिराजच्या हेअरस्टाईलची चेष्टा-मस्करी केली.

या मुलाखतीत श्रेयसने सांगितले की, मालिकेपूर्वी त्याने असा विचार केला होता की, तो नाबाद राहून भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.

चहल श्रेयसशी बोलत असताना सिराजही कॅमेऱ्यासमोर आला. मग काय होतं, चहलने त्याची मजा घेतली. खरं तर सिराजने नुकतीच केसांची नवीन हेअरस्टाईल केली आहे. त्याची हेअरस्टाईलही सध्या चर्चेत आहे. सिराज कॅमेऱ्यामध्ये येताच चहल म्हणाला की, “सिराजचे स्वागत आहे. त्याचे केस पाहा, असे दिसते की बऱ्याच काळापासून गवताला कोणी पाणी दिले नाही आणि ते पूर्णपणे सुकले आहे.”

चहलने असे म्हणताच, ते तिघेही हसू लागतात. चहलने सिराजला विचारले की, “हे खरं आहे का? की, तू प्रत्येक सामन्यापूर्वी केस कापण्यासाठी सलूनमध्ये जातो का?” यावर सिराज म्हणाला की, “असे काही नाहीये. मी असंच केस कापतो. यामागे कोणतेही लॉजिक नाही.”

सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने श्रीलंका संघाला ६ विकेट्सने पराभूत केले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १४६ धावा कुटल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने श्रेयस अय्यरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान ४ विकेट्सने पार केले. अय्यरने या सामन्यात नाबाद अर्धशतक ठोकले.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंकेला क्लीन स्वीप देत भारताने लावली विक्रमांची रांग! मायदेशात सर्वाधिक विजयाबरोबरच ‘हे’ पराक्रमही नावावर

टीम इंडिया विजयीरथावर आरुढ! सलग १२ वा टी२० सामना जिंकत ‘या’ दोन संघांची विश्वविक्रमात बरोबरी

तिसऱ्या टी२०साठी मैदानात पाऊल ठेवताच रोहितचा विश्वविक्रम, पाकिस्तानच्या शोएब मलिकला टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---