---Advertisement---

जवळचा भिडू असूनही ‘हा’ क्रिकेटर कुलदीपला म्हणाला, ‘…तर चापट खाशील’; व्हिडिओ व्हायरल

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 3:14 PM
Kuldeep-Yadav
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल गोलंदाजी बरोबरच आपल्या मजेशीर स्वभावासाठीही चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. गुरुवारी बीसीसीआयने चहलचा एक व्हिडीओ ट्वीट केला असून त्यात तो कुलदीप यादवसोबत मजेशीर खेळ खेळताना दिसून येत आहे. या खेळादरम्यान युजवेंद्र चहल कुलदीप यादवला चापट मारण्याबद्दलही बोलला आहे. चला जाणून घेऊया, यामागचे नेमके कारण काय आहे?

खरतर चहलने या खेळात डोक्यावर एक पांढऱ्या रंगाचा कागद पकडला होता, ज्यामध्ये खेळाडूंची नावे लिहिली होती. समोर उभा असलेला कुलदीप यादव त्या खेळाडूचा अभिनय करताना दिसत आहे. तर चहलला त्या खेळाडूचे नाव ओळखायचे होते. सर्वप्रथम त्या कागदावर एमएस धोनीचे नाव लिहिले गेले आणि कुलदीपने त्याची नक्कल केली. पण तो व्यवस्थित अभिनय करत नसल्याने चहल धोनीचे नाव ओळखू शकला नाही. म्हणून त्याने गमतीत कुलदीपला चापट मारल्याबद्दल विधान केले. तो म्हणतो की, जास्त ओव्हर ऍक्टिंग केलीस तर चापट खाशील.

बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कुलदीप यादवने धोनीव्यतिरिक्त इशांत शर्मा, रिषभ पंत आणि विराट कोहलीची नक्कल करताना दिसून आला आणि युजवेंद्र चहलनेही पुढील सर्व खेळाडूंची नावे ओळखली आहेत.

कुलदीप-चहलची जोडी एकत्र दिसणार
श्रीलंकेविरुद्ध 18 जुलैपासून सुरू होणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची जोरदार तयारी करीत आहेत. गुरुवारी भारतीय संघाने पहिले दिवस-रात्र नेट सराव सत्र केले आहे. या मालिकेद्वारे भारतीय खेळाडू आगामी टी20 विश्वचषकासाठी संघात स्थान मिळविण्यासाठी मेहनत घेताना दिसतील. या स्पर्धेत चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल हे दोघेही एकत्र दिसू शकतात.

हे दोन्ही खेळाडू गेल्या अनेक सामन्यांमध्ये खेळणाऱ्या 11 खेळाडूंमध्ये एकत्र खेळले नाहीत. मात्र, आता श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेमध्ये कुलदीप आणि चहल हे दोघे अंतिम 11 खेळाडूंमध्ये एकत्र दिसू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या-

SLvIND: देवदत्त-ऋतुराजला पाहावी लागेल वाट, ८०० धावा चोपणारा ‘हा’ खेळाडूच करणार ओपनिंग!

SLvIND: सकारियाचे पदार्पण, पडीक्कल-गायकवाडच्या प्रतिक्षेत आणखी वाढ; ‘अशी’ असेल संभाव्य टीम धवन

क्रिकेटचा वारसा लाभलेल्या ‘या’ बड्या क्रिकेटरने नवव्या क्रमांकावर झळकावलीत २ शतके 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---