कोलकाता। वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील आता टी२० मालिकेचा केवळ तिसरा आणि शेवटचा सामना बाकी आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील या टी२० मालिकेत (T20I Series) भारतीय संघाने आधीच २-० अशी विजयी आघाडी घेतली असल्याने तिसऱ्या सामन्यातील निकालाने मालिका विजेत्यावर फरक पडणार नाही. पण, तरी भारतीय संघ तिसरा टी२० सामना जिंकून वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न करेल. तसेच वेस्ट इंडिज संघाचा तिसरा टी२० सामना जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल.
विराट, पंतच्या अनुपस्थितीत सामना
तिसऱ्या टी२० सामन्यापूर्वी (3rd T20I) विराट कोहली आणि रिषभ पंत या दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे ते भारतीय संघाच्या बायोबबलमधून बाहेर पडले आहेत. दरम्यान, आता तिसऱ्या टी२० सामन्यात त्यांच्या जागेवर कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे. तरी, या दोन जागांसाठी श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड हे दोघे प्रबळ दावेदार आहेत.
तसेच, मालिकेत विजयी आघाडी घेतलेली असल्याने भारतीय संघव्यवस्थापन आपल्या बेंच स्ट्रेंथमधील खेळाडूंना तिसऱ्या टी२० सामन्यासाठी संधी देऊ शकतात.
आमने-सामने इतिहास
भारत आणि वेस्ट इंडिज संघात आत्तापर्यंत १९ टी२० सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १२ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर ६ सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. तसेच १ सामन्याच्या निकाल लागलेला नव्हता.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० सामना २० फेब्रुवारी २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० सामना कुठे खेळवला जाणार?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० सामना ईडन गार्डन, कोलकाता येथे खेळवला जाईल.
३. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० सामना किती वाजता सुरु होणार?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.
४. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, दीपक हुडा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान.
वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, रोस्टन चेस, ओडियन स्मिथ, अकील हुसैन, रोमारियो शेफर्ड, शेल्डन कॉट्रेल, फॅबियन ऍलन, शाय होप, डॅरेन ब्राव्हो, डोमिनिक ड्रेक्स, हेडन वॉल्श.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने तोडला साहाचा विश्वास, केले मोठे दावे; पण शेवटी कसोटीतून नारळ दिलाच
शाहरुखने रणजीमध्ये केली टी२० स्टाईल धुलाई! इतक्या चेंडूत कुटल्या १९४ धावा
हरियाणा स्टिलर्स ‘टेबल टॉपर’ पटणा पायरेट्सला पराभूत करण्यात अपयशी, स्पर्धेतूनही झाले बाहेर






