---Advertisement---

Third T20I: पराभवानंतर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल, श्रेयसच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी निश्चित?

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 2:40 PM
brian lara stadium
---Advertisement---

भारतीय संघाला सोमवारी (०१ ऑगस्ट) सेंट किंट्स येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात ५ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. यासह वेस्ट इंडिजने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. यानंतर आता मंगळवारी (०२ ऑगस्ट) उभय संघात तिसरा टी२० सामना रंगेल. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या अंतिम एकादशमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. 

टी२० मालिका (T20 Series) १-१ ने बरोबरीत आल्यानंतर आता दोन्ही संघ तिसरा सामना (Third T20I) जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असतील. उभय संघातील हा सामना वॉर्नर पार्क स्टेडियम, सेंट किट्स येथेच रंगणार आहे. या सामन्यातही दुसऱ्या टी२० सामन्याप्रमाणे खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नसेल. याउलट गोलंदाजांना या खेळपट्टीकडून मदत मिळू शकते. अशात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.

अशात या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (Team India’s Playing Xi) बदल करणे साहजिक आहे. पहिल्या दोन्हीही टी२० सामन्यात मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरलेल्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. सूर्यकुमारने पहिल्या टी२० सामन्यात सलामीला फलंदाजीला येत १६ चेंडूत फक्त २४ धावा केल्या होत्या. तसेच दुसऱ्या सामन्यातही त्याला फक्त ११ धावा करता आल्या. अशात आता तिसऱ्या सामन्यासाठी त्याच्याजागी लयीत असलेल्या युवा सलामीवीर इशान किशनला (Ishan Kishan) खेळवले जाऊ शकते.

तसेच सातत्याने संधी देऊनही अपयशी ठरत असलेल्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. त्याच्याजागी दिपक हुड्डाला (Deepak Hooda) आजमावले जाऊ शकते. तसेच अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याच्या महागड्या गोलंदाजीनंतर कुलदीप यादव त्याची जागा घेऊ शकतो.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि आवेश खान

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘रोहित आणि द्रविडचं काहीतरी चाललंय!’, भुवनेश्वरची सूर्यकुमारविषयी मोठी प्रतिक्रिया

‘हा तर सुर्यकुमार यादवला संपवण्याचा डाव?’, भारताच्या माजी दिग्गजाचे कर्णधार रोहितवर प्रश्नचिन्ह

पराभवानंतर वाढले भारतीय संघाचे टेंशन, फॉर्मात असलेला ‘हा’ गोलंदाज तिसऱ्या टी२०तून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---