कोलकाता। भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात नुकतीच ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) झाली. या मालिकेतील अखेरचा सामना (3rd T20I) रविवारी (२० फेब्रुवारी) पार पडला. या सामन्यात कायरन पोलार्डच्या नेतृत्त्वातील वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
आवेश खानचे पदार्पण
या सामन्यातून भारताकडून आवेश खानने (Avesh Khan) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले. तो भारताकडून टी२० पदार्पण करणारा ९६ वा खेळाडू ठरला. तसेच हे त्याची आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील ठरले. त्यामुळे भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारा तो एकूण ३८६ वा खेळाडू ठरला. त्याला त्याच्या पदार्पणाची कॅप अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या हस्ते मिळाली.
याबरोबरच या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात एकूण चार बदल करण्यात आले. या सामन्यातून यापूर्वीच विराट कोहली आणि रिषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली होती, तर सामन्याच्या काहीवेळापूर्वी भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांनाही विश्रांती देण्यात आली. त्यामुळे संघात आवेश खानचे पदार्पण झाले. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांचे अंतिम ११ जणांच्या संघात पुनरागमन झाले.
त्याचबरोबर नाणेफेकीवेळीच रोहितने हे स्पष्ट केले होते की, या सामन्यात भारताकडून सलामीला ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांची जोडी येईल.
Congratulations to Avesh Khan who is all set to make his T20I debut for India. @Paytm #INDvWI pic.twitter.com/1vHk2QLDVM
— BCCI (@BCCI) February 20, 2022
तसेच वेस्ट इंडिजने अंतिम ११ जणांच्या संघात चार बदल केले आहेत. त्यांनी हेडन वॉल्श, फॅबियन ऍलेन, डॉमिनिक ड्रेक आणि शाय होप यांना ११ जणांच्या संघात संधी दिली आहे.
या सामन्यातील निकालाने मालिका विजेत्यावर फारसा फरक पडला नाही. कारण भारतीय संघाने यापूर्वीच मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली होती.
Kieron Pollard calls it right at the toss and West Indies will bowl first in the final T20I.
Ishan Kishan and Ruturaj Gaikwad to open for #TeamIndia.
Live – https://t.co/e1c4fOY0JR #INDvWI @Paytm pic.twitter.com/neUc2V1PX6
— BCCI (@BCCI) February 20, 2022
असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत – ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान.
वेस्ट इंडिज – काइल मेयर्स, शाय होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमरियो शेफर्ड, डॉमिनिक ड्रेक्स, फॅबियन ऍलन, हेडन वॉल्श.
महत्त्वाच्या बातम्या –
…तरच हार्दिक पंड्याला मिळणार टीम इंडियात संधी, निवड समिती प्रमुखांनी केले स्पष्ट
युएईत सुरू होणार नवी टी२० लीग! शाहरुखसह अदानी-अंबानी असणार संघमालक
रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राची दणदणीत विजयाने सुरुवात! सत्यजित बच्छावची भेदक गोलंदाजी