---Advertisement---

आज होत असलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात या ५ विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा

On: मंगळवार, नोव्हेंबर 6, 2018 4:21 PM
---Advertisement---

विंडीजविरुद्ध कसोटी आणि वन-डेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज टी२०मध्ये विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सध्या टीम इंडिया या मालिकेत चांगली खेळत आहे.

आज या सामन्यात अनेक विक्रम होऊ शकतात. त्यातील काही खास

१. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा १०वा खेळाडू होण्यासाठी रोहितला केवळ ९४ धावांची गरज. रोहितने ३०३ सामन्यात ४२.७३च्या सरासरीने ११०२५ धावा केल्या आहेत. सध्या या स्थानावर व्हीव्हीएस लक्ष्मण असुन त्याने २२० सामन्यात ४१.६४च्या सरासरीने ११११९ धावा केल्या आहेत.

२. टी२०मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्यासाठी रोहितला केवळ ११ धावांची गरज. रोहितने ८५ टी२० सामन्यात ३२.१८च्या सरासरीने २०९२ धावा केल्या आहेत. सध्या भारताकडून अव्वल स्थानी विराट कोहली असुन त्याने ६२ सामन्यात ४८.८८ च्या सरासरीने २१०२ धावा केल्या आहेत.

३. टी२०मध्ये भारताकडून टी२०मध्ये १ हजार धावा करण्यासाठी शिखर धवनला २० धावांची गरज. त्याने ४१ सामन्यात २५.७८ सरासरीने ९८० धावा केल्या आहेत. त्याने जर या २० धावा केल्या तर भारताकडून टी२०मध्ये १ हजार धावा करणारा तो विराट, रोहित, रैना, धोनी आणि युवराजपाठोपाठ ६वा खेळाडू ठरेल.

४. टी२०मध्ये ५० विकेट्स पुर्ण करण्यासाठी बुमराहला ६ विकेट्सची गरज. त्याने ३६ सामन्यात २०.०९च्या सरासरीने ४४ विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून केवळ आर अश्विनने टी२०त (५२) ५० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

५. बुमराहप्रमाणेच टी२०मध्ये ५० विकेट्स पुर्ण करण्यासाठी चहलला ८ विकेट्सची गरज. त्याने २६ सामन्यात १८.९७ च्या सरासरीने ४२ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

२०००सालापुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले ६ खेळाडू आजही खेळतात क्रिकेट

५ वर्षांपुर्वी हाच दिवस होता सचिन- रोहितसाठी कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण

आणि त्याने वयाच्या ४१व्या वर्षी घेतली कसोटी क्रिकेटमध्ये विकेट

कसोटी क्रिकेटमध्ये आज इतिहास घडला, रंगना हेराथचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात खेळण्याचा अजिंक्य रहाणेने व्यक्त केला विश्वास

धोनी, विराटलाही जे जमले नाही ते रोहित शर्माला करण्याची संधी

एकही चेंडू न टाकता विराटने घेतली होती पहिली टी20 विकेट

बर्थडेच्या दिवशीच पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराटचा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment