---Advertisement---

कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या भारताच्या स्वप्नाचा होणार चक्काचूर? अजब आहे कारण

On: बुधवार, फेब्रुवारी 17, 2021 7:30 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातदरम्यान ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. याच मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर यजमान भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आणि ३१७ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

दुसर्‍या कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या काळ्या मातीच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून टीका केली जात होती. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने या खेळपट्टीला ‘शॉकर’ म्हणून संबोधले होते. सामना संपल्यानंतरही हा वाद थांबलेला नाही. या खेळपट्टीबाबत आता आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला असून, यामुळे भारतीय संघाचे बरेच नुकसान होऊ शकते.

आयसीसी घेऊ शकते हा निर्णय

दुसऱ्या चेन्नई कसोटीसाठी वापरलेल्या खेळपट्टीवरील माती पहिल्या दिवसापासून उडून जात होती. त्यामुळे या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ‘आयसीसीने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या एमए चिदंबरम स्टेडियमवरील खेळपट्टीला ‘खराब’ घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने हा निर्णय जाहीर केल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताला तीन गुणांचे नुकसान होईल.’

मागील महिन्यात ऑस्ट्रेलियात मालिका विजय साजरा केल्यानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे आगेकूच करताना दिसत होता. मात्र, खेळपट्टीमुळे भारतीय संघाला गुणांचे नुकसान झाल्यास त्याचा परिणाम भारतीय संघाच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या मार्गात होऊ शकतो.

लॉर्ड्सवर खेळवला जाणार स्पर्धेचा अंतिम सामना

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर खेळवला जाईल. न्यूझीलंडच्या संघाने याआधीच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीनही संघांना अजूनही अंतिम सामना खेळण्याची संधी मिळू शकते. भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेनंतरच अंतिम सामन्यासाठीचा दुसरा संघ निश्चित होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

Ind vs Eng : मर्यादित षटकांच्या मालिकेला भारताचा ‘हा’ प्रमुख खेळाडू मुकणार? जाणून घ्या कारण

पदार्पणाच्या कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेणारा अक्षर पटेल नववा भारतीय; कोण आहेत अन्य ८ गोलंदाज, घ्या जाणून

“त्याला जाऊ देणे गरजेचे होते”, रूटने सांगितले मोईन अलीला मायदेशी पाठवण्यामागचे खरे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---