---Advertisement---

मार्च महिन्यात ‘हा’ संघ येतोय भारत दौऱ्यावर; पुन्हा मिळणार ‘यंग ब्रिगेड’ला संधी

On: मंगळवार, डिसेंबर 14, 2021 1:37 AM
india young brigade
---Advertisement---

सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी (vijay hazare trophy) खेळली जात आहे. भारतात क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळाडू समोर येत असतात. विजय हजारे ट्रॉफीत देखील असे अनेक फलंदाज आणि गोलंदाज समोर येत आहेत. पुढच्या वर्षात अफगाणिस्तान संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. अशात अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेत भारताच्या काही युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळू शकते. या युवा खेळाडूंमध्ये प्रामुख्याने ऋतुराज गायकवाड आणि वेंकटेश अय्यर यांची नावे आघाडीवर आहेत.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने त्यांचे आगामी काळातील वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकात पुढच्या वर्षातील मार्च माहिन्यात त्यांचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेत बीसीसीआय त्यांच्या ब संघाला मैदानात उतरवू शकते. यादरम्यान संघाचे वेळापत्रक व्यस्त असल्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. अशात ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर यांना संधी मिळू शकते. तसेच संजू सॅमसनसारखे खेळाडू पुनरागमन करू शकतात.

भारतीय संघ १६ डिसेंबरला कसोटी आणि वनडे मालिका खेळण्यासाठी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेत युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याविषयी बातम्या समोर आल्या आहेत. ऋतुराजने सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत सलग तीन शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. त्यापूर्वी त्याने आयपीएल २०२१ मध्ये देखील अप्रतिम प्रदर्शनासह सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.

युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यरने विजय हजारे ट्रॉफीत फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही गोष्टींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने रविवारी चंडीगढ संघाविरुद्ध सामन्यात १५२ धावा केल्या होत्या. तसेच केरळ संघाविरुद्ध सामन्यातही त्याने ११२ धावांची तुफानी खेळी केली होती. वेंकटेशच्या गोलंदाजीचा विचार केला, तर त्याने चार सामन्यांमध्ये ८ विकेट्स घेतल्या आहेत. या युवा खेळाडूंचे अलिकडच्या काळातील प्रदर्शन पाहता अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी मालिकेत त्यांना संधी मिळेल, हे निश्चित मानले जात आहे की.

महत्वाच्या बातम्या –

‘अरे माझ्या कॉलेजच्या नोट्सही त्यातच राहिल्या…’, विमानात सामान विसरलेल्या क्रिकेटपटूचं आयसीसीकडे गाऱ्हाणं

माजी सलामीवीराने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’; चार भारतीयांना मिळाली जागा

माजी सलामीवीराने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’; चार भारतीयांना मिळाली जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---