---Advertisement---

75 वर्ष वय असलेल्या सुनिल गावसकरांचा भन्नाट डान्स, पहा व्हिडीओ

On: रविवार, मार्च 9, 2025 11:57 PM
---Advertisement---

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजेतेपद पटकावल्यानंतर देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. या ऐतिहासिक विजयाने प्रत्येक भारतीयाच्या मनात आनंदाची लाट निर्माण केली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेले भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही आपल्या खास शैलीत आनंद व्यक्त केला. 75 वर्षीय गावस्कर यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर सामना सादरीकरणा दरम्यान ठेका धरला.

गावस्कर यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांचे चाहते आणि क्रिकेटप्रेमी त्यांच्या उत्साहाला दाद देत आहेत. गावस्कर यांच्या या डान्सने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाची रंगत आणखी वाढवली. या वयातही त्यांचा उत्साह पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले.

याआधी वानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गावस्करांनी ‘नाटू नाटू’ गाण्यावर ठेका धरला होता. या कार्यक्रमात गावस्करांनी आपल्या नृत्य कौशल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. क्रिकेट क्षेत्रात आपल्या खेळाने सर्वांनाच वेड लावणाऱ्या गावस्करांनी आपल्या नृत्य कौशल्यानेही सर्वांनाच भारावून टाकले.

सुनील गावस्कर हे भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. निवृत्तीनंतरही ते क्रिकेटशी जोडलेले आहेत आणि ते समालोचक म्हणून काम करतात. त्यांनी अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा भारतीय क्रिकेटला नेहमीच झाला आहे.

2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर खेळवली गेली. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करत अंतिम सामन्यात विजय मिळवला. या विजयाने भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा आनंदित केले आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी दाखवली.

हेही वाचा – 
संस्कार! मॅच संपल्यावर कोहली पडला ‘या’ क्रिकेटरच्या आईच्या पाया!
बक्षिसांचा ‘महापूर’; चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारताने केली ‘मालामाल’, इतर संघांनाही मिळाली मोठी रक्कम!
हिटमॅन’चा धमाका; आयसीसी स्पर्धेत पहिले अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---