भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघांतील शेवटचा वनडे सामना चांगलाच रोमांचक झाला. शेवटच्या 9 षटकात भारताला 36 धावा हव्या होत्या आणि संघाकडे पाच विकेट्स देखील होत्या. पण बांगलादेशच्या गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन करत भारताला शेवटच्या षटकात सर्वबाद केले. विजयासाठी एक धाव कमी असताना मेघना सिंगने विकेट गमावली आणि भारतीय संघ सर्वबाद झाला. परिणामी मिरपूरमध्ये खेळला गेलेला हा तिसरा वनडे सामना बरोबरीत सुटला.
उभय संघांतील या सामन्याचा बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारीत 50 षटकांमध्ये बांगलादेशने 4 बाद 225 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 225 धावांवर सर्वबाद झाला. शेवटच्या षटकात भारताला तीन धावा हव्या होत्या. पण षटकातील तिसऱ्या चेंडूवर मारुफा अख्तर (Marufa Akter) हिने मेघना सिंग (Meghna Singh) हिला यष्टीरक्षक निगर सुलतानच्या हातात झेलबाद केले. भारती संघाची ही शेवटची विकेट होती. परिणामी संघ विजयापासून एवघ्या एका धावेच्या अंतरावर सर्वबाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला.
भारतीय संघासाठी सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने 59, तर हरलीन देओल हिने 77 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पण कर्णधार हरमनप्रीत कौर 14 धावांची खेळी करून बाद झाला. बांगलादेशसाठी निदार अख्तरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. मारुफा अख्तरने दोन विकेट्स घेतल्या. तर सुलदाना खातून राबिया खान फाहिमा अख्तर आणि शोभना मोस्टरी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. मालिकेतील हा शेवटचा सामना भारताने जिंकला असता, तर मालिका देखील नावावर केली असती. पण शेवटचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर मालिका देखील 1-1 अशा बरोबरीवर सुटली. (India Women Vs Bangladesh Women 3rd ODI has been tied.)
महत्वाच्या बातम्या –
माजी दिग्गजाचा मोठा दावा! सीएसकेचा पुढचा कर्णधार असेल युवा ‘हा’ खेळाडू
BREAKING: श्रीलंकेच्या विश्वविजेत्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती, वर्ल्डकपआधी घेतला धक्कादायक निर्णय