भारतीय पुरुष संघ पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारत विरुद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार असून 20 जून 2025 पासून पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. भारताच्या पुरुष संघाबरोबरच महिला संघही पुढील वर्षी इंग्लंडचा दौरा करणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे आज (22 ऑगस्ट) भारतीय महिला संघाच्या इंग्लंड दौऱ्याची घोषणा केली आहे.
भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघात जून ते जुलै 2025 दरम्यान 5 सामन्यांची टी20 मालिका आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. 28 जूनपासून पहिल्या टी20 सामन्याने या दौऱ्याचा शुभारंभ होईल. नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर हा सामना खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना 1 जुलै रोजी ब्रिस्टल येथे होणार आहे. तिसरा सामना 4 जुलै रोजी लंडनमध्ये होणार आहे. तर मालिकेतील चौथा सामना 9 जुलै रोजी मँचेस्टर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 12 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे होईल.
त्यानंतर केवळ 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर भारत आणि इंग्लंड महिला संघात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना 16 जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे होणार आहे. दुसरा सामना 19 जुलै रोजी लंडनमध्ये आणि तिसरा व शेवटचा सामना 22 जुलै रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळवला जाईल.
𝗔𝗹𝗹 𝗦𝗲𝘁!👍 👍#TeamIndia‘s schedule for the 5⃣ T20Is and 3⃣ ODIs against England in 2025 ANNOUNCED 🗓️#ENGvIND pic.twitter.com/fb0tScY8cq
— BCCI Women (@BCCIWomen) August 22, 2024
दरम्यान भारतीय महिला संघ सध्या टी20 विश्वचषक 2024 च्या तयारीत व्यस्त आहे. महिला टी20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती. मात्र बांगलादेशातील खराब राजकीय वातावरणामुळे त्यांच्याकडून यजमानपद हिरावून घेण्यात आले आहे. आता ही स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. यामध्ये भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी होईल. तर भारतीय संघाचा दुसरा सामना कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानशी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. तर शेवटचा साखळी सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
हेही वाचा –
क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा! ऑस्ट्रेलियन संघात 3 भारतीय वंशाच्या खेळाडूंची एन्ट्री
फुटबॉलनंतर रोनाल्डोचा यूट्यूबवरही धुमाकूळ! अवघ्या 90 मिनिटांत मोडले सर्व रेकॉर्ड
श्रीलंकेच्या फलंदाजाचा मोठा पराक्रम! बलविंदर सिंग संधू यांचा 41 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला