भारतीय संघासाठी विश्वचषक 2023 स्पर्धेतील नववा सामना खूपच खास ठरला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला जबरदस्त अंदाजात 8 विकेट्सने पराभूत केलं. भारताचा विश्वचषकातील हा सलग दुसरा विजय होता. या आधी भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने मात दिली होती. अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन केलं. याव्यतिरिक्त रोहित शर्मा याने वनडे विश्वचषकातील सर्वात जलद शतक ठोकलं. तसेच, विराट कोहली यानेही अर्धशतकी खेळी केली. मात्र, भारताच्या एका जलदगती गोलंदाजाने खूप खराब प्रर्दशन केलं. त्यामुळे त्याच्या नावावर एक लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला.
कोण आहे तो खेळाडू?
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने खूपच खराब प्रर्दशन केलं. त्याच्याविरुद्ध अफगाणिस्तानच्या हशमतुल्लाह शाहिदी आणि अजमतुल्लाह उमरजई यांनी खूप धावा कुटल्या. सिराजने 9 षटकात 76 धावा देत एकही विकेट घेतली नाही. तो विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा चौथा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्यामुळे त्याच्या नावावर एक लाजीरवाणा विक्रम जमा झाला.
वनडे विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने विश्वचषक 2019 मध्ये इंग्लंडविरुद्ध 88 धावा दिल्या होत्या. त्यानंतर जवागल श्रीनाथ हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी एका सामन्यात 87 धावा दिल्या होत्या, तर तिसऱ्या क्रमांकावर करसन घावरी असून त्यांनी 1975 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 83 धावा दिल्या होत्या.
वनडे विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारे भारतीय गोलंदाज-
88 धावा- युझवेंद्र चहल
87 धावा- जवागल श्रीनाथ
83 धावा- करसन घावरी
76 धावा- मोहम्मद सिराज*
पाकिस्तानशी भिडणार भारत
भारतीय संघाला विश्वचषकातील आपला तिसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना येत्या 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडेल. या सामन्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (India won but Mohammed Siraj had an embarrassing record read here)
हेही वाचा-
भारताच्या विश्वचषकातील कामगिरीवर ‘क्रिकेटचा देव’ भलताच खुश; म्हणाला, ’14 ऑक्टोबरची…’
मोठी बातमी! ‘या’ दौऱ्यासाठी पाकिस्तान संघ जाहीर, वर्षभरानंतर अनुभवी खेळाडूचे पुनरागमन