टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीच्या चौथ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ आमने- सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने 4 विकेट्सने सामना जिंकला. मागील विश्वचषकात पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले होते. आता या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करत बदला घेतला. या सामन्याचा शिल्पकार विराट कोहली ठरला.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 159 धावा चोपल्या. भारताने हे आव्हान 6 विकेट्स गमावत पूर्ण केले.
T20 WC 2022. India Won by 4 Wicket(s) https://t.co/mc9usehEuY #INDvPAK #T20WorldCup
— BCCI (@BCCI) October 23, 2022
भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली याने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्याने या धावा करताना 4 षटकार आणि 6 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या यानेही 40 धावांचे योगदान दिले. यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला 2 आकडी धावसंख्या पार करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा फक्त 4 धावांवर तंबूत परतला.
यावेळी पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना हॅरिस रौफ याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच, नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पाकिस्तानचा डाव
यावेळी पाकिस्तानकडून फलंदाजी करताना शान मसूद (Shan Masood) याने अर्धशतक केले. त्याने 42 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. या धावा करताना त्याने 5 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) यानेही अर्धशतक झळकावले. त्याने यावेळी 34 चेंडूत 51 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 2 चौकार आणि 4 षटकारही मारले. तसेच, केवळ शाहीन आफ्रिदी यालाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. तो 16 धावा करून तंबूत परतला. यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. कर्णधार बाबर आझम (Babar Azam) हा पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर बाद होत तंबूत परतला.
यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांनी शानदार कामगिरी केली. या दोघांनीही प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. हार्दिकने 4 षटके गोलंदाजी करताना 30 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच, अर्शदीप यानेही 4 षटके गोलंदाजी करताना 32 धावा देत 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनीही प्रत्येकी एक विकेट आपल्या नावावर केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रगीतावेळी रोहित झाला भावूक, पाकिस्तानविरुद्ध मैदानात उभा असताना डोळे बंद करून रडला कर्णधार
मुस्कुराने की वजह तुम हो! पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करताच पंड्याने दिली स्माईल, व्हिडिओ व्हायरल