पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू होणार आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये 110 हून अधिक भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं कुस्तीमध्ये 2 पदकं जिंकली होती. या ऑलिम्पिकमध्ये देखील भारतीय कुस्तीपटूंकडून पदकाची अपेक्षा आहे. भारतानं ऑलिम्पिकच्या इतिहासात कुस्तीमध्ये एकूण 7 पदकं जिंकली आहेत. या बातमीद्वारे ऑलिम्पिकच्या इतिहासात पदक जिंकणाऱ्या भारतीय कुस्तीपटूंबद्दल माहिती जाणून घेऊया.
खशाबा जाधव हे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक पदक विजेते होते. त्यांनी 1952 च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या 57 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं होतं. आश्चर्याचं म्हणजे, सुरुवातीला त्यांची संघात निवड झाली नव्हती. मात्र नंतर पटियालाच्या महाराजांच्या विनंतीवरून त्यांना संघात स्थान मिळालं. खशाबा जाधव यांना पुन्हा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही आणि ते महाराष्ट्र पोलिसात रुजू झाले.
यानंतर कुस्तीत भारताचं दुसरं पदक थेट 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये आलं. या ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारनं पुरुषांच्या 66 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं होतं. सुशील कुमारनं 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये देखील चमकदार कामगिरी करत आपल्या पदकाचा रंग बदलला. यावेळी त्यानं रौप्य पदक मिळवलं. यासह स्वतंत्र भारतात 2 पदकं जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला. लंडन ऑलिम्पकमध्येच योगेश्वर दत्तनं पुरुषांच्या फ्रीस्टाइल 60 किलो वजनी गटातकांस्यपदक जिंकलं. ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो तिसरा भारतीय कुस्तीपटू ठरला.
2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिनं 58 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. यानंतर 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनिया आणि रवी दहिया यांनी पदकं जिंकली होती. बजरंग पुनियानं कांस्यपदक जिंकलं. तर रवी कुमार दहियाला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
संपुर्ण यादीः घटस्फोट घेतलेले 9 दिग्गज भारतीय क्रिकेटर्स, एकाने तर…
बिग ब्रेकिंग ! अखेर हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट, हार्दिकने स्वतः दिली माहिती
याला दुर्दैव असेच म्हणावे का? टी20मध्ये जबरदस्त कामगिरी, तरीही दिग्गज खेळाडूचा श्रीलंका दौऱ्यातून वगळले