विश्वचषक 2023 चा शेवटचा साखळी सामना 12 नोव्हेंबर रोजी भारत आणि नेदरलँड्स यांच्यात बेंगलोर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, ज्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये आघाडीच्या फलंदाजांनी गोलंदाजांना चांगलेच झोडपून काढले आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील संघ 7 नोव्हेंबरलाच बेंगळुरूला पोहोचला आहे. यानंतर खेळाडूंना एक दिवसाची विश्रांती दिली गेली होती. भारतीय संघाने 8 नोव्हेंबरपासून सरावाला सुरुवात केली.
शनिवारी स्टार स्पोर्ट्सने भारतीय संघाच्या सराव सत्राचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. भारतीय संघासाठी दोन नेट लावण्यात आले होते. कर्णधार रोहित प्रथम फलंदाजीला आला, त्याने घातक शैलीत फलंदाजी करत आक्रमक फटके खेळले. यानंतर शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवही सराव करताना दिसले. तर जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, सिराज आणि कुलदीप यादव गोलंदाजीमध्ये घाम गाळताना दिसले. यादरम्यान रोहितने चायनामन कुलदीपला काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या.
भारताला पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाशी सामना करायचा आहे. हा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. जेव्हा हे दोन संघ साखळी सामन्यात आमने-सामने आले होते, तेव्हा भारतीय संघाने किवीजचा चार विकेट्स राखून पराभव केला होता.
https://www.instagram.com/p/CzgLpfwM4k6/
न्यूझीलंड संघाने 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला 18 धावांनी पराभूत करून स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला होता. भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता त्यांचा वरचष्मा दिसतोय. मात्र, न्यूझीलंड महत्त्वाच्या सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरीसाठी ओळखला जातो. आता कोणता संघ हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारणार हे पाहायचे आहे. (Indian batsmen showed strength in the practice session Rohit-Kohli and other players played great shots, watch the video)
म्हत्वाच्या बातम्या
विश्वचषकात 500 पेक्षा जास्त धावा खर्च करणारे गोलंदाज, एक बॉलर थोडक्यात वाचला; पाहा यादी
इंग्लंडकडून हारताच बाबरने कुणालाच नाही सोडलं, वाचून काढला चुकांचा पाढा; म्हणाला, ‘जर आम्ही…’