---Advertisement---

टीम इंडियाच्या या चार गोलंदाजांनी हॅट्रिक घेत गाजवले २०१९ चे वर्ष!

On: मंगळवार, डिसेंबर 31, 2019 4:02 PM
---Advertisement---

2019 हे वर्ष आज संपत आहे. हे वर्ष भारतीय गोलंदाजांसाठी खास ठरले. यावर्षी भारताच्या तब्बल 4 गोलंदाजांनी हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली.

यावर्षात भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कसोटीत, मोहम्मद शमीने(Mohammed Shami) आणि कुलदीप यादवने(Kuldeep Yadav) वनडेमध्ये आणि दीपक चाहरने(Deepak Chahar) टी20मध्ये हॅट्रिक घेतली आहे. विशेष म्हणजे एका वर्षात क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात हॅट्रिक घेणारा भारत पहिलाच संघ आहे.

बुमराहने ऑगस्टमध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळताना हॅट्रिक घेतली होती. तसेच त्याआधी शमीने यावर्षी जूनमध्ये 2019 वनडे विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध साऊथँम्पटन येथे खेळताना हॅट्रिक घेतली होती.

त्याचबरोबर चाहरने 10 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध नागपूरला पार पडलेल्या टी20 सामन्यात हॅट्रिक घेतली होती. कुलदीपने 18 डिसेंबरला वेस्ट इंडिज विरुद्ध विशाखापट्टणमला पार पडलेल्या वनडे सामन्यात हॅट्रिक घेतली होती.

2019 या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज –

कसोटी –

जसप्रीत बुमराह (विरुद्ध वेस्ट इंडिज, किंग्स्टन)

वनडे –

मोहम्मद शमी (विरुद्ध अफगाणिस्तान, साऊथँप्टन)

कुलदीप यादव (विरुद्ध वेस्ट इंडिज, विशाखापट्टणम)

टी20 –

दिपक चाहर (विरुद्ध बांगलादेश, नागपूर)

https://twitter.com/Maha_Sports/status/1211928248323473408

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---