सध्या भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना कटकच्या मैदानावर खेळला जात आहे. दरम्यान भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले. दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) परतला आणि वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) या फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
भारताच्या गोलंदाजीदरम्यान, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वेगवान गोलंदाज हर्षित राणावर (Harshit Rana) ओरडताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. डावाच्या 32 व्या षटकात हर्षित राणा गोलंदाजी करत असताना हा प्रकार घडला.
खरेतर, वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या (Harshit Rana) चुकीमुळे इंग्लंडला 4 अतिरिक्त धावा मिळाल्या तेव्हा रोहित शर्माचा राग सुटला. ही घटना 32व्या षटकात घडली, जेव्हा राणा जोस बटलरला गोलंदाजी करत होता. बटलरने षटकातील पाचव्या चेंडूचा बचाव केला. यानंतर, हर्षितने चेंडू उचलला आणि अनावश्यकपणे स्टंपवर फेकला. राणाचा हा थ्रो स्टंपला लागला नाही आणि चेंडू चौकार गेला. यामुळे ओव्हर थ्रोद्वारे इंग्लंडच्या खात्यात 4 अतिरिक्त धावा जमा झाल्या.
या चुकीबद्दल रोहित शर्माने हर्षित राणाला फटकारले. अष्टपैलू हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) हर्षितच्या या कृतीवर नाराज दिसला. रोहित शर्मा स्टम्प माइकमध्ये “तुझा मेंदू कुठे आहे” असे म्हणत असल्याचे ऐकले गेले आणि त्यानंतर तो हर्षितवर ओरडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Rohit Sharma was visibly irate when Harshit Rana’s reckless overthrow resulted in an unnecessary boundary.#INDvENGpic.twitter.com/7isBgo6tUp
— 𝓟𝓻𝓲𝓷𝓬𝓮 🥂 (@whyy__prince) February 9, 2025
दुसऱ्या वनडे सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड- फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाची शानदार विजयी परतफेड; श्रीलंकेचा केला घरात घुसून अपमान
टीम इंडियात नवा सुपरस्टार; ‘या’ खेळाडूला मिळाली पदार्पणाची संधी
IND vs ENG; इंग्लंडनं जिंकला टाॅस, फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11