सध्या भारतीय संघ मायदेशात इंग्लंडच्या संघाविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळतो आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून भारतीय संघ १-२ अशा फरकाने पिछाडीवर आहे. मात्र भारतीय कर्णधार विराट कोहली या मालिकेत दमदार कामगिरी करत आहे. त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या टी२० सामन्यात नाबाद अर्धशतके झळकवण्याची किमया केली आहे.
त्याचेच फळ त्याला नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत मिळाले आहे. या क्रमवारीत कोहलीने एका स्थानाने प्रगती केली आहे. मात्र याच मालिकेतील तीनही सामन्यात अपयशी ठरलेल्य केएल राहुलचे मात्र या क्रमवारीत नुकसान झाले आहे. त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे.
कोहली पोहोचला पाचव्या स्थानी
भारतीय कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात ४९ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली. तर तिसऱ्या सामन्यातही हाच फॉर्म कायम राखताना त्याने ४६ चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी उभारली. या दोन अर्धशतकांमुळे त्याच्या आयसीसीच्या टी२० फलंदाजी क्रमवारीत सुधारणा झाली आहे. कोहलीने एका स्थानाने प्रगती करून पाचवे स्थान गाठले आहे.
मात्र त्याचवेळी दुसरीकडे भारताचा सलामीवीर केएल राहुलची या क्रमवारीत घसरण झाली आहे. राहुलने या मालिकेतील तीन सामन्यात अनुक्रमे १, ० आणि ० अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे एका स्थानाने खाली येऊन तो आता चौथ्या स्थानी स्थिरावला आहे. त्याच्या घसरणीमुळे चौथ्या क्रमांकावरील पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
Back-to-back fifties in the ongoing #INDvENG series have helped Virat Kohli reclaim the No.5 spot in the @MRFWorldwide ICC T20I Player Rankings 👀
Full list: https://t.co/iM96Oe6eu6 pic.twitter.com/JkxEyZGTLr
— ICC (@ICC) March 17, 2021
डेव्हिड मलान अव्वल स्थानी कायम
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड मलानने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. सध्या चालू असलेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यात त्याने केवळ ६६ धावा काढल्या आहेत. मात्र दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचपेक्षा तब्बल ६४ रेटिंग गुणांनी पुढे असल्याने त्याच्या अव्वल स्थानाला कुठलाही धोका निर्माण झाला नाही. अव्वल १० मध्ये असलेला तो इंग्लंडचा एकमेव फलंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या:
वेस्ट इंडिज लिजेंड्सची इंग्लंडवर मात, आता सेमिफायनलमध्ये होणार भारताशी मुकाबला
तिसऱ्या सामन्यात या रणनितीने भारताला पाजले पाणी, सामनावीर जोस बटलरचा खुलासा
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, आयपीएलमध्ये मिळू शकते सामना पाहण्याची संधी