---Advertisement---

आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारे ६ भारतीय कर्णधार; विराटच्या नावावर आहे ‘हे’ एकमेव जेतेपद

---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात साऊथॅम्पटन येथे आयसीसी जागतिक कसोटी अंजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना न्यूझीलंड संघाने ८ विकेट्सने जिंकत इतिहास रचला. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहलीला दुसऱ्यांदा वरिष्ठ भारतीय संघाचे नेतृत्व करताना आयसीसीच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.  यापूर्वी २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.

असे असले तरी विराटच्या नावावर कर्णधार म्हणून एका आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद आहे. त्याने २००८ साली १९ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विश्वचषकात विजेतेपद मिळवले आहे.

त्याच्याबरोबरच कपिल देव, एमएस धोनी, मोहम्मद कैफ, सौरव गांगुली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने किमान एक आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

सर्वात प्रथम वरिष्ठ पुरुष भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ला विश्वचषक जिंकला. हे भारताचे पहिले आयसीसीचे विजेतेपद ठरले. त्यानंतर २००२मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ भारतीय संघाने श्रीलंकेसह संयुक्तरित्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले. त्यावेळी पावसामुळे भारत आणि श्रीलंका संघातील अंतिम सामना पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे संयुक्त विजेतेपद देण्यात आले होते.

यानंतर वरिष्ठ पुरुष भारतीय संघाने २००७ चा पहिला टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन आयसीसी ट्रॉफी धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला.

तसेच १९ वर्षांखालील विश्वचषक भारताने आत्तापर्यंत ४ वेळा जिंकला आहे. तसेच या चारही वेळी भारताचे कर्णधार वेगवेगळे होते. सर्वात आधी १९ वर्षांखालील भारतीय संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली २००० साली विश्वचषक जिंकला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २००८ला, उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली २०१२ला आणि पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली २०१८ ला १९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला.

भारताचे (युवा, पुरुष, महिला) आयसीसी स्पर्धांचे विजेते कर्णधार –
कपिल देव – पुरुष वनडे विश्वचषक १९८३
सौरव गांगुली – चॅम्पियन्स ट्रॉफी २००२
एमएस धोनी – टी२० पुरुष विश्वचषक २००७, पुरुष वनडे विश्वचषक २०११, चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३
मोहम्मद कैफ – १९ वर्षांखालील विश्वचषक २०००
विराट कोहली – १९ वर्षांखालील विश्वचषक २००८
उन्मुक्त चंद – १९ वर्षांखालील विश्वचषक २०१२
पृथ्वी शॉ – १९ वर्षांखालील विश्वचषक २०१८

महत्त्वाच्या बातम्या – 

‘लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे, करोडपती की…?’, चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर स्मृती मंदानाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

WTC च्या अंतिम सामन्यादरम्यान न्यूझीलंडच्या चाहत्यांनी स्टेडिअममध्येच काढले कपडे; वाढवला आपल्या संघाचा उत्साह

टीम इंडिया ऑल आऊट होताच इंग्लंडच्या माजी कर्णधाराने चोळले भारतीय चाहत्यांच्या जखमांवर मीठ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---