---Advertisement---

‘गुरुजी इतरांकडून चँपियन बनण्याचे धडे घेतायत’; विम्बल्डन फायनल पाहायला गेलेले शास्त्री झाले ट्रोल

On: सोमवार, जुलै 12, 2021 9:51 AM
---Advertisement---

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत. परंतु इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या हातून 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे क्रिकेपटूंसह त्यांच्यावरही टीका केली जात आहे. अशात भारतीय संघाला मिळालेल्या सुट्टीचा फायदा घेत रवी शास्त्री विम्बल्डन अंतिम सामना बघायला गेले होते. मात्र यावरुनही चाहत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर 4 ऑगस्टपासून भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. परंतु त्या अगोदर भारतीय संघाला पराभवातून बाहेर येण्यासाठी 3 आठवड्यांची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीसह सर्व क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर प्रशिक्षक शास्त्री देखील आपल्या पद्धतीने सुट्टी घालवताना दिसून आले.

शास्त्री इंग्लंडमध्ये चालू असलेल्या विम्बल्डन स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यास गेले होते. नोवाक जोकोविच आणि मॅटिओ बेरेट्टिनी यांच्यात हा सामना रंगला होता. शास्त्रींनी या सामन्यातील आपला फोटो पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांचा हा फोटो काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर त्यांचे मीम्सदेखील व्हायरल होण्यास सुरूवात झाली.

अनेकांनी प्रेक्षकांच्या गर्दीत बसलेल्या शास्त्रींना बाजूच्यांनी ओळखले नसल्याचे सांगत त्यांची थट्टा केली आहे. तर काहींनी त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकता न आल्याने टोमणे मारले आहेत.

https://twitter.com/asthaaa17/status/1414248286391705608?s=20

https://twitter.com/Khelwallah1/status/1414260003213516805?s=20

शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक बनल्यापासून आजपर्यंत संघाला एकही आयसीसी चषक जिंकून देऊ शकले नाहीत. येता टी२० विश्वचषक २०२१ ही त्यांच्यासाठी अखेरची संधी असणार आहे. कारण यानंतर त्यांचा प्रशिक्षणपदाचा कार्यकाळ संपणार आहे. जर त्यांनी भारतीय संघाला टी२० विश्वचषक जिंकून दिला तर त्यांचा कार्यकाळ पुढे वाढवला जाऊ शकतो; नाहीतर त्यांची हकालपट्टी होणे जवळजवळ निश्चित आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

नजर हटी दुर्घटना घटी! अश्विनचा चेंडू सोडणे फलंदाजाला पडले महागात, झाला बोल्ड

हिशोब बरोबर! शेफालीने घेतला सूड, शून्यावर बाद करणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाला मारले सलग ५ चौकार

‘तू गोलंदाजी करतोय की भिक मागतोय?’, त्यावेळी सेहवागने फलंदाजी करतानाच शोएब अख्तरला केले होते गपगार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---