---Advertisement---

‘भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप नाही जिंकली तरी चालेल, पण…’, भारताच्या माजी सलामीवीराची अजब इच्छा

On: रविवार, जून 6, 2021 10:45 PM
---Advertisement---

एकीकडे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात झाली असली तरी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीही वातावरण निर्मिती सुरु झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत खेळला जाईल. मात्र, काही भारतीय माजी क्रिकेटपटूंनी इंग्लंड विरुद्ध होणारी पाच सामन्याची कसोटी मालिका प्रतिष्ठेची बनवली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा निकाल काहीही लागो. परंतु, भारतीय संघाने इंग्लंडला कसोटी मालिकेत पराभूत करावे ही या खेळाडूंची इच्छा आहे.

भारताने कसोटी मालिका जिंकली
भारतीय संघाचा माजी सलामीवीर व सध्या समालोचक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आकाश चोप्रा याने आपल्या युट्युब चॅनेलवर अनेक चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप व इंग्लंड विरुद्धची मालिका यापैकी भारताने काय जिंकलेले तुम्हाला आवडेल?

या प्रश्नाचे उत्तर देताना आकाश चोप्रा म्हणाला, “हा उत्तम प्रश्न आहे. तुम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकू इच्छिता. कारण की एक आंतरराष्ट्रीय व मानाची स्पर्धा आहे. ही स्पर्धा प्रथमच होतेय आणि तुमच्याकडे सर्वात्तम संघ देखील आहे. यात भारताचा पराभव झाला तरी, संघ खराब ठरत नाही.”

याच प्रश्नाच्या उत्तरात पुढे बोलताना आकाश चोप्राने सांगितले, “तुम्हाला एकच उत्तर पाहिजे असेल तर मी म्हणेल भारताने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका जिंकावी. कारण, २००७ नंतर आपण इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय मिळवला नाही.” भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सुरू होईल जी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपन्न होईल.

इंग्लंडमध्ये भारताची खराब कामगिरी
भारतीय संघाने इंग्लंडमध्ये आपला अखेरचा कसोटी मालिका २००७ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात १-० अशा फरकाने मिळवला होता. त्यानंतर, २०११ च्या दौऱ्यावर ४-०, २०१४ दौऱ्यावेळी ३-१ व २०१८ मध्ये ४-१ अशा फरकाने पराभव पत्करलेला. भारतीय संघ आत्तापर्यंत इंग्लंडमध्ये केवळ ७ विजय मिळवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

हे शुभारंभ! जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघाची तयारी सुरू; जडेजाने शेअर केले फोटो

कॅप्टन कूल जेव्हा करतो दुधाच्या किमतीवर चर्चा, पाहा धोनीचे जुने भन्नाट ट्विट

“शमी भारताचा सर्वात्तम गोलंदाज”, दिग्गज अष्टपैलूने मांडले रोखठोक मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---