---Advertisement---

‘क्रिकेटचे द्रोणाचार्य’ वासू परांजपे काळाच्या पडद्याआड; गावसकर, तेंडुलकरसारख्या दिग्गजांना केले होते मोलाचे मार्गदर्शन

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 2:58 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये महान प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळवलेले, तसेच ‘क्रिकेटचे द्रोणाचार्य’ म्हणवले जाणारे वासू परांजपे यांचे सोमवारी (३० ऑगस्ट) वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. परांजपे गेल्या काही काळापासून पार्किन्सन नावाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांनी मुंबईतील माटुंगा येथील आपल्या राहत्या घरात शेवटचा श्वास घेतला.

परांजपे यांनी सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर ते आजच्या रोहित शर्मा यांसारख्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना घडवण्यात मोलाचे योगदान दिले होते. परांजपे यांनी प्रशिक्षक होण्यापूर्वी क्रिकेट देखील खेळले होते. त्यांनी मुंबईकडून २८ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांनी २ शतकं आणि २ अर्धशतकांचा मदतीने ७८५ धावा केल्या होत्या.

मात्र, परांजपे एक खेळाडूपेक्षा एक महान प्रशिक्षक म्हणून नावारूपाला आले. परांजपे यांनी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर अशा अनेक दिग्गज खेळाडूंच्या सुरुवातीच्या काळात प्रशिक्षकाचे काम केले होते. तसेच परांजपे ८० च्या दशकात बीसीसीआयचे प्रशिक्षणाचे मुख्य अधिकारी देखील राहिले होते.

परांजपे यांच्या निधनानंतर संपूर्ण क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतातील अनेक दिग्गज खेळाडूंसोबत परांजपे यांच्या भावनिक आठवणी जोडलेल्या होत्या. परांजपे यांच्या निधनानंतर भारतातील तमाम क्रिकेटपटूंनी परांजपे यांना आपली श्रद्धांजली वाहिली. संजय मांजरेकर, अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, सुनील गावसकर, यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी परांजपे यांच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.

महत्त्वाच्या बातम्या –
रवींद्र जडेजाने त्याची जर्सी दिली मायकल वॉनला; कारण जाणून वाटेल अभिमान
रिषभ पंतच राहणार दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार? वाचा संघव्यवस्थापन काय विचार करतायत
जो रूट अँड कंपनीने लॉर्ड्सच्या पराभवातून घेतला धडा, ‘ही’ चूक सुधारत लीड्समध्ये भारताला केले पराभूत

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---