भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या कोणताही क्रिकेट सामना खेळत नाहीये. 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकच्या तयारीत कर्णधार व्यस्त आहे. रोहित शर्माने स्पर्धेपूर्वी जिममध्ये चांगलीच कसरत करताना दिसत आहे. आशिया चषकसाठी भारतीय कर्णधाराने जोरदार तयारी सुरू केली. गेल्या आशिया चषकात भारताला सुपर 4 टप्प्यातून बाहेर पडावे लागले होते. मात्र, यावेळी भारतीय संघ आणखी एक आशिया चषक विजेतेपद मिळवायच्या तयारीत आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) ने जिम करतानाचा व्हिडिओ त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा प्रचंड घाम गाळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रोहित विविध व्यायाम करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CvyruQ0Id6v/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
रोहित शर्माचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. काही वेळापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला पाच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय चाहत्यांनीही व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने रोहित शर्माला “महान कर्णधार” असे संबोधले. याशिवाय आणखी एका यूजरने सांगितले की, “रोहित शर्मा सध्याच्या पिढीतील सर्वोत्तम सलामीवीर आहे.” तर एका यूजरने लिहिले की, “कॅप्टन आशिया कप आणि वर्ल्ड कप जिंक.” रोहित शर्माच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अप्रतिम प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आशिया चषक 2023मध्ये भारत पाकिस्तान 2 सप्टेंबरला भिडणार आहेत
आशिया चषक 2023 हा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यातून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि अनेक स्टार खेळाडू भारतीय संघात पुनरागमन करणार आहेत. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टी20 मालिका खेळत आहे. भारतीय संघ टी20 मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. (indian cricket team captain rohit sharma shared a gym video he ready for asia cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानचा युवा फलंदाज करणार विराट कोहली आणि बाबर यांची बरोबरी! माजी कर्णधाराचे माठे वक्तव्य:
‘या’ भारतीयाने स्विंगच्या जोरावर 15 वर्ष दिला त्रास, ऍरॉन फिंचने स्वतः केले मान्य