सिडनी कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपल्यामुळे भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्येच अडकला आहे. वास्तविक, भारताच्या दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट 7 जानेवारीला होणार होता. संपूर्ण संघ 8 जानेवारीला भारतात परतणार होता. मात्र आता अखेरची कसोटी दोन दिवस आधीच संपल्यामुळे संघ ऑस्ट्रेलियातच थांबला आहे.
बीसीसीआय सध्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्या परतीच्या तिकिटांचा बंदोबस्त करत आहे. तिकिट मिळताच संघ भारतात परतेल. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला 1-3 ने पराभव पत्कारावा लागला. यासह ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, टीम इंडिया सध्या परतीच्या तिकिटांचा बंदोबस्त करण्यात गुंतली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, भारतीय संघाला 8 जानेवारीला उड्डण घ्यायचं होतं. मात्र मालिका लवकर आटोपल्यानं काही खेळाडू लवकर परतू शकतात. हे तिकिट कधी उपलब्ध होईल, यावर अवलंबून असेल.
याचा अर्थ असा की, सर्व खेळाडू एकत्र भारतात परतणार नाहीत. भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाला जाताना देखील एकत्र रवाना झाले नव्हते. विराट कोहली थेट लंडनहून ऑस्ट्रेलियाला पोहचला होता. तो 10 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला सर्वप्रथम पोहचणारा भारतीय खेळाडू होता.
पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियानं सिम्युलेशन सामना खेळला. यानंतर मुख्य दौऱ्याची सुरुवात झाली. पहिला कसोटी सामना पर्थ येथे, दुसरा सामना ॲडलेड येथे, तिसरा सामना ब्रिस्बेन, चौथा सामना मेलबर्न आणि पाचवा कसोटी सामना सिडनी येथे खेळला गेला. अशाप्रकारे या दोन महिन्यांच्या कालावधीत भारताने ऑस्ट्रेलियात एकूण 7700 किमी पेक्षा जास्त प्रवास केला.
हेही वाचा –
‘त्याला माजी खेळाडूंशी…’, आऊट ऑफ फाॅर्ममध्ये असलेल्या ‘विराट’ला इरफान पठाणने सुनावले
“यामुळे भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली”, सौरभ गांगुलीने कोणाला दोष दिला?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया अडचणीत? शमीनंतर बुमराहच्या दुखापतीमुळे टेन्शन वाढलं!