भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू जेवढ्या स्टाईलने खेळतात, कपडे घालतात किंवा स्वत: जेवढं स्टायलिश राहतात, तेवढंच ते आपल्या घरालाही स्टायलिश ठेवत असतात. घर ही एक अशी जागा असते, जिथं आपण सर्वात चांगला वेळ घालवत असतो. त्यासाठी घराला खूप खर्चही करत असतो. नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने नवीन घर खरेदी केले आहे. तो त्याचे ४८ वर्षे जुने वडिलोपार्जित घर सोडून नवीन ठिकाणी राहायला जाणार आहे. त्याने कोलकाता शहराच्या मधोमध ठिकाणी घर घेतले आहे. या घराची किंमत ४० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. आलिशान घर खरेदी करणारा गांगुली एकटा भारतीय खेळाडू नाही. त्याच्यापूर्वी अनेक भारतीय खेळाडूंनी आलिशान घर खरेदी केले आहेत.
त्यामुळे आपण आज या लेखात भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या घरांची माहिती करुन घेणार आहोत, ज्याला बघून तुम्हीही म्हणाल, “वाह भाई घर हो तो ऐसा.”
Sourav Ganguly's new home pic.twitter.com/vGigNQUqjZ
— Akash Kharade (@cricaakash) May 20, 2022
चला तर मग या लेखात आपण जाणून घेऊया भारतीय संघाच्या ५ क्रिकेटपटूंच्या आलिशान घरांविषयी.
भारताच्या ५ क्रिकेटपटूंची आलिशान घरं- 5 Indian Cricketers and Their Lavish Homes
विराट कोहली
प्रथम, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट (Virat Kohli) कोहलीबद्दल बोलूया. आपल्या सर्वांना माहीत आहे की, विराट दिल्लीचा आहे आणि त्याचा तिथं एक आलिशान बंगलाही आहे. त्याने २०१६मध्येच मुंबईमध्ये घर घेतलं. आता युवराज सिंगही (Yuvraj Singh) वरळीमधील त्याच बिल्डींगमध्ये त्याचा शेजारी झाला आहे. विराटच्या घराची किंमत ३४ कोटी रुपये सांगितली जाते आहे. ओमकार १९७३ टाॅवर या बिल्डिंगमधील सी विंगमध्ये ३५व्या मजल्यावर विराटचा हा अलिशान फ्लॅट आहे.
https://www.instagram.com/p/BzdpaH-lDes/?utm_source=ig_web_copy_link
त्यातच त्याने आणखी एक नवीन घर दिल्लीमध्ये घेतलं आहे. जे ५००० चौरस फूटांमध्ये बांधलं आहे. हे घर त्याने गुरगाव, हरियाणामध्ये घेतले असून डिएलएफ फेज १ मध्ये आहे. त्याची किंमत ८० कोटींच्या दरम्यान आहे. त्याच्या या नवीन घरात जिम, स्विमिंग पूल (जलतरण तलाव), पार्किंग आणि गार्डन (बाग) यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) याच वांद्रेमध्ये ५ मजली बंगला आहे. त्याचं हे घर सुमारे ६००० चौरस फूट जागेत बांधलेलं आहे. ज्यात स्विमिंग पूल ते पार्किंगपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. सचिनच्या घराच्या ग्राऊंड फ्लोअरला एक गणपतीचे मंदिर आहे. तसेच एक डायनिंग एरिया व त्याला मिळालेले पुरस्कार ठेवले आहेत.
Travelled from hyd To Mumbai
Two days in Mumbai ..visited once a day 😀 Just seeing god's house can't leave from that street 😍 These two days gave me lifetime MEMORIES .19-A Perry cross road Official temple,Mosque,church.etc For All SACHINISTS #HappyBirthdaySachin@sachin_rt pic.twitter.com/JwpJnLm8gh— Rohith Sachinist (@SachinistRohith) April 23, 2020
पेरी क्राॅस रोड व टर्नर रोडच्या जंक्शनवर वांद्रे येथे सचिनचे हे घर आहे. हे घर बांधण्यासाठी ४ वर्ष लागली असून २००७मध्ये सचिनने हे घर ३९ कोटींना खरेदी केले होते. बेसमेंटमध्ये ५० गाड्या बसू शकतात एवढी मोठी पार्किंग या घराला आहे. या घरात एक स्विमिंग पूल व जीम देखील आहे.
हरभजन सिंग
Never seen Dhauladar range from my home rooftop in Jalandhar..never could imagine that’s possible..clear indication of the impact the pollution has done by us to Mother Earth 🌍.. this is the view pic.twitter.com/laRzP8QsZ9
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 3, 2020
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचे (Harbhajan Singh) घरदेखील खूप आलिशान आहे. हरभजनचा हा सुंदर बंगला चंदीगडमध्ये आहे, जो खूप मोठा आहे. हरभजनचा हा बंगला २००० चौरस फुटात पसरलेला आहे. त्यात त्याने जीमपासून अनेक सुविधा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हरभजन सिंगचे मुंबईतही घर असून त्याची पत्नी गीता बासराने ते डिजाईन केले आहे. जानेवारी २०१९मध्ये हरभजनने त्याचे जालंधरमधील घर पाडले असून येथे तो त्याच्या आईसाठी खास घर बनवणार आहे.
एमएस धोनी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे (MS Dhoni) अतिशय सुंदर असं घर रांचीमध्ये आहे. धोनीने स्वत: आपला बंगला डिझाईन केला आहे. या घरात त्याने मोठ्या हवेशीर खिडक्या बसविल्या आहेत. त्याच्या बंगल्यात एक मोठा जलतरण तलाव (स्विमिंग पूल) आणि एक सुंदर बाग आहे. तसेच या बंगल्यात गाड्यांसाठी एक मोठी पार्किंगदेखील आहे. तेथे धोनीच्या बाईक्स व कार असतात. धोनीच्या त्याच्या बंगल्याच्या लाॅनमध्ये वेगाने गाडी चालवतो, यावरुन त्याच्या बंगल्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रफळाचा अंदाज येईल.
View this post on Instagram
धोनीच्या घराचे नाव कैलाशपती असे आहे. यात एक इनडोअर स्टेडियम देखील आहे. हे घर बांधण्यासाठी त्याला ३ वर्ष लागले. रांची मधील हामरु रोडवर धोनीचे जुने घर होते. तेथून या ठिकाणी येण्यासाठी धोनीला २० मिनीटं लागतात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सीझनचा शेवटचा सामनाही कसा काय गमावला? शेवटी धोनीने मनातलं उत्तर दिलं, पाहा काय म्हणाला