भारतीय संघाकडे नेहमीच दमदार फलंदाजांचा भरणा राहिला आहे, ज्यांनी आपल्या फलंदाजीच्या बळावर आपल्या देशाचे नावे उंचावले आहे. त्यांची क्रिकेट खेळण्याची क्षमता लहानपणापासून दिसून येते. सचिन तेंडुलकरला बघा, वयाच्या अगदी १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले. सचिननंतर असे खूप खेळाडू आले, ज्यांनी लहान वयात आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. काही असे पण खेळाडू आहेत, ज्यांनी लहान वयात पदार्पण तर केलेच आणि सर्वाधिक जास्त षटकार मारण्याचा विक्रमही केला.
या लेखात आपण अशाच फलंदाजांविषयी चर्चा करणार आहोत, ज्यांनी वयाच्या २४ वर्षांच्या आत सर्वाधिक षटकार मारले. तर जाणून घेऊया भारतीय संघातील त्या ४ खेळाडूंबद्दल.
४. इरफान पठाण- पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामन्यात पहिल्याच षटकात हॅट्रिक घेणारा वेगवान गोलंदाज इरफान पठाण सगळ्यांना माहितीच असेल. इरफान पठाणने अंडर -१९ मध्ये पाकिस्तान विरुद्ध एकाच सामन्यात ९ गडी बाद केले होते. १९ वर्षाच्या आतच इरफानला भारतीय संघात स्थान मिळाले होते. सुरुवातीला इरफान फक्त गोलंदाजी करत असे. काही काळानंतर इरफानने फलंदाजीमध्ये कमाल करण्यास सुरुवात केली. त्याची शैली बघून प्रशिक्षक ‘ग्रेग चॅपेल’ यांनी वीरेंद्र सेहवागच्या अनुपस्थित इरफानला सलामीसाठी पाठवले. त्यामुळेच इरफानने वयाच्या २४ वर्षांच्या आत ५३ षटकार मारले. दरम्यान, इरफानने कारकिर्दीत २९ कसोटी सामने, १२० एकदिवसीय सामने आणि २४ टी-२० सामने खेळले.
३. सचिन तेंडूलकर- क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरने जगात सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त अर्धशतके आणि शतके करण्याचा विक्रमसुद्धा सचिनच्या नावावर आहे. जवळजवळ ३५००० धावा सचिनच्या नावावर आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात करणाऱ्या सचिनने वयाच्या २४ वर्षांच्या आत ५८ षटकार मारले होते. आजवर सचिनने एकदिवसीय सामन्यात १९५ षटकार आणि कसोटी सामन्यात ६९ षटकार मारले आहेत.
२. रिषभ पंत- २०१७ साली आंतराष्ट्रीय संघात पदार्पण करणाऱ्या पंतने अजून स्वतःला त्या स्थरावर सिद्ध केले नव्हते. परंतु गेल्या २ वर्षात त्याची कामगिरी पाहण्यासारखी राहिली आहे. यष्टीरक्षणासोबत त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध पंतने अतिशय सुंदर खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. लहान वयात पंतने असे कारनामे केले, ज्याची त्या वयात लोकं स्वप्न बघतात. पंतचे वय आता २३ वर्ष आणि २४३ दिवस आहे. त्याने आतापर्यंतच्या छोट्या कारकिर्दीत ७५ षटकार लगावले आहेत.
१. सुरेश रैना- एकेकाळी भारताच्या टी-२० संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून जाणारा सुरेश रैना पहिला भारतीय खेळाडू आहे, ज्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक ठोकले आहे. सुरेश रैनाने आजवर २२६ एकदिवसीय सामने, १८ कसोटी सामने आणि ७८ टी-२० सामने खेळले आहेत. आईपीएल सामन्यात सर्वात लहान वयात उप-कर्णधार म्हणून सुरेश रैना विख्यात होता. त्याने गुजरात लायन्स संघाचे कर्णधारपद सुद्धा भूषवले आहे. वयाच्या २४ वर्षांच्या आत रैनाने ७८ आंतरराष्ट्रीय षटकार मारले आहेत. त्याच सोबत रैनाने आंतरराष्ट्रीय सामन्यात ८००० धावा देखील केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजांची फिरकी घेणारा भज्जी बनला ‘कूक’, त्याने बनवलेला पदार्थ बघून तोंडात येईल पाणी
भारतीय खेळाडूंसमोर असेल ‘हे’ आव्हान; इंग्लंडमध्ये असलेल्या विहारीचे वक्तव्य
विराटपेक्षा रोहित आहे यशस्वी कर्णधार, ‘ही’ आहेत त्यामागची ५ समर्पक कारणे






