भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव मागील काही दिवसांपासून कसोटी संघातून बाहेर आहे. परंतु पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला पुनरागमन करायची संधी मिळू शकते. या संधीचा फायदा घेण्यासाठी सध्या उमेश यादव खूप कष्ट घेत आहे. याच दरम्यानचा फोटो उमेश यादवने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो गोलंदाजीबरोबर फलंदाजीमध्येही सुधारणा करताना दिसत आहे.
भारतीय संघाच्या ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी उमेश यादव खूप प्रयत्न करत आहे. इंग्लंडच्या परिस्थितीत त्याच्या स्विंग गोलंदाजीमुळे भारताला बरेच यश मिळू शकते. परंतु जर उमेश यादवला अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळवायचे असेल तर आणखी एक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसोबत स्पर्धा करावी लागेल.
उमेश यादवने सराव करत असतानाचे काही फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. यावर त्याने कॅप्शन दिले आहे की, ‘प्रत्येकाला जागे होण्याची मिळालेली संधी, ही स्वत:ला आणखी चांगले बनवण्याची संधी असते.’ उमेशने या पोस्टवरून असे म्हटले आहे की, तो पुन्हा भारतच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
Every chance you wake is a chance to get better. pic.twitter.com/YInzMXVyKI
— Umesh Yaadav (@y_umesh) July 23, 2021
सध्या झालेल्या काउंटी सिलेक्ट इलेवनविरुद्धच्या ३ दिवसीय सराव सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादवने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. या सराव सामन्यात उमेश यादवने टाकलेला चेंडू खूप स्विंग होत होता. आपल्या या उत्कृष्ट प्रदर्शनाद्वारे त्याने ३ गडी बाद केले आहेत. आता भारतीय संघाला दुसरा तीन दिवसीय सराव सामना २८ जुलै रोजीपासून खेळायचा आहे. यानंतर भारतीय संघ आणि इंग्लंड संघाविरुद्ध ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
महत्वाचे म्हणजे भारत आणि इंग्लंड संघात होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत उमेश यादवला अकरा खेळाडूंच्या संघात स्थान मिळेल का नाही? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी नव्हे तर ‘हा’ दिग्गज होता भारतीय टी२० संघाचा पहिला कर्णधार, धवन असेल केवळ सातवा
इशारे तेरे..! भारताचा धुरंधर इशान किशनचे डोळ्यांचे इशारे पाहिले का? करतील तुम्हालाही घायाळ
गोड बातमी! नव्या वर्षाचा आनंद होणार द्विगुणित, भारताच्या ‘या’ त्रिशतकवीराच्या घरी हालणार पाळणार






