भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टीमॅक यांच्यावर सॅफ कप शिस्तपालन समितीने कारवाई केली आहे. कुवेत विरुद्धच्या सामन्यात झालेल्या वादानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे ते पुढील दोन सामन्यात भारतीय संघाच्या डग आऊटमध्ये दिसू शकणार नाहीत. यासोबतच 500 अमेरिकन डॉलर्स इतका दंड देखील त्यांना ठोठावण्यात आला आहे.
स्टीमॅक यांना या स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात रेड कार्ड मिळाले होते. त्यानंतर नेपाळ विरुद्धच्या सामन्यात येलो कार्ड त्यांना दाखवण्यात आलेले. कुवेत विरुद्धच्या सामन्यात देखील सलग दुसरे यलो कार्ड मिळाल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली गेली. भारतीय संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारत अंतिम फेरीत पोहोचला तरी भारतीय संघाला आपल्या मुख्य प्रशिक्षकां विना मैदानात उतरावे लागेल.
सॅफ कप स्पर्धेत अ गटात असलेला भारतीय संघ अद्याप अपराजित आहे. पाकिस्तान विरुद्ध च्या पहिल्याच सामन्यात भारताने 4-0 असा विजय मिळवला होता. त्यानंतर नेपाळ विरुद्ध च्या सामन्यातही भारताने 2-0 असा विजय संपादन केलेला. कुवेतविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात मात्र भारताला बरोबरी साधावी लागली. असे असले तरी भारतीय संघ उपांत्य फेरीत जागा बनवण्यात यशस्वी ठरला.
(Indian Football Team Head Coach Igor Stimac Suspended In SAFF Cup)
महत्वाच्या बातम्या-
MPL मधून मिळाली महाराष्ट्राची ‘यंग ब्रिगेड’! भविष्यात ठोठावतील टीम इंडियाचे दार
अश्विनकडून पाकिस्तानच्या बॉलिंग अटॅकचं कौतुक, स्पिनर्सची खाण असलेल्या ‘या’ संघाकडून उलटफेरची अपेक्षा