भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. गेल्या दीड दशकात धावा करणारा कोहली अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी खेळाडू आहे. त्याची फलंदाजी पाहून अनेक मुले क्रिकेट खेळू लागली आणि नंतर या खेळात आपले करिअर करायचे ठरवले. विराटमुळे क्रिकेटच्या खेळालाही फायदा झाला आहे. कोहलीसारख्या खेळाडूंमुळे अनेकजण क्रिकेट बघू लागले.
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि मोठ्या नेत्यांपर्यंत सर्व स्तरातील लोक विराट कोहली याचे चाहते आहेत. तो इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेला भारतीय आहे. या यादीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या नावाचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी याचा खुलासा केला.
रोटरी इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी कार्यक्रमादरम्यान जयशंकर म्हणाले, “मी विराट कोहलीचा चाहता आहे असे म्हणेन. मी त्याचे कौतुक करतो, विशेषत: माझ्या कार्यक्षेत्रात राजकारण असो किंवा मुत्सद्देगिरी हे अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्र आहे, बंगळुरूमध्ये जेव्हा मी त्याला खेळताना पाहतो तेव्हा तो शुद्ध स्पर्धात्मकतेचा प्रतिक असतो.”
कोहलीने विश्वचषक 2023 मध्ये 11 सामन्यात 765 धावा केल्या होत्या. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला. विराट आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेतून त्याने विश्रांती घेतली होती. मात्र, 2022 च्या टी20 विश्वचषकानंतर कोहलीने देशासाठी एकही टी20 सामना खेळला नाही आणि आता टी20 संघात पुनरागमन करणे त्याच्यासाठी कठीण असल्याचे मानले जात आहे. तथापि, अनेक जणांचा असा विश्वास आहे की, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या वरिष्ठ खेळाडूंनी 2024 च्या टी20 विश्वचषकात खेळले पाहिजे कारण दोन्ही दिग्गज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत आणि दोघेही टी20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहेत. (Indian Foreign Minister S Jaishankar also became a fan of Virat Said When I met him in Bangalore)
हेही वाचा
हार्दिक पंड्याची पत्नी नताशा चाहत्यांच्या निशाण्यावर, पोस्टवर अश्लिल कमेंट करत केले ट्रोल
नेथन लायनबद्दल ऑस्ट्रेलियन कर्णधाराचं लक्षवेधी विधान; म्हणाला, ‘तो शेन वाॅर्नचा विक्रम…’