---Advertisement---

IND vs AUS; मोहम्मद सिराजच्या वागण्यावर संतापला दिग्गज! हेडसोबतच्या वादावर केले मोठे वक्तव्य

---Advertisement---

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील दुसरा कसोटी सामना ॲडलेड ओव्हल येथे रंगला आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅविस हेडला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 140 धावांवर बाद केल्यानंतर भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) सिराजने दिलेला उत्साहपूर्ण निरोप “अनावश्यक” असल्याचे म्हटले आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना माजी भारतीय दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले, “तुम्ही मला विचाराल तर ते अनावश्यक आहे. त्या व्यक्तीने 140 धावा केल्या आहेत, तो एक-दोन धावांवर बाद झाला नाही. ज्याने शानदार फलंदाजी करून प्रेक्षकांची मने जिंकली अशा व्यक्तीला तुम्ही निरोप देत नाही. त्याला बाहेर काढण्यासाठी नायक बनण्याऐवजी सिराज खलनायक बनला आहे.”

पुढे बोलताना सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले “’ट्रॅविस हेड बाद झाल्यानंतर सिराजने फक्त टाळ्या वाजवल्या असत्या तर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी तो हिरो ठरला असता. त्याऐवजी, त्याला प्रेक्षकांकडून टीका मिळाली आणि ते समजण्यासारखे आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

चेतेश्वर पुजारानं सांगितलं भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप कामगिरीमागचं कारण, म्हणाला…
बाप तसा लेक! वीरेंद्र सेहवागच्या धाकट्या मुलाचा गोलंदाजीत कहर
इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप! ईसीबीच्या या निर्णयाविरोधात खेळाडू बंड करण्याचा तयारीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---