विराट कोहली भारतीय क्रिकेटमधलं एक मोठं नाव नाही, तर जगभरात त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कोहलीने आपल्या खेळाने छाप पाडून जगभरात आपलं कमवालं आहे. कोहलीसोबत खेळणारा टीम इंडियाचा माजी फिरकीपटू अमित मिश्राने कोहलीच्या प्रसिद्धीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. माजी फिरकीपटू म्हणाला की, प्रसिद्धी आणि शक्तीने विराट कोहलीला बदलले आहे. रोहित शर्माबद्दल तो म्हणाला की त्याच्यामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही.
अमित मिश्रा हा आयपीएलमधील लखनउ सुपर जायंट्सचा भाग आहे. तो टीम इंडियातून निवृत्त झाला आहे, पण तो आयपीएलमध्ये खेळतो. आता ‘शुभंकर मिश्रा’च्या यूट्यूब चॅनलवर बोलताना भारताचा माजी फिरकीपटू म्हणाला की विराटमध्ये खूप बदल झाला आहे, तर रोहित शर्मा अजूनही जवळपास तसाच आहे. त्याने सांगितले की, टीम इंडियामध्ये विराटचे मित्रही कमी आहेत.
अमित मिश्रा म्हणाला “प्रत्येकजण इतका प्रामाणिक नसतो. एक क्रिकेटर म्हणून मी त्याचा खूप आदर करतो, पण मी त्याच्यासोबत पूर्वी असे समीकरण शेअर करत नाही. विराटचे मित्र कमी का आहेत? त्याचा आणि रोहितचा स्वभाव आहे. आताही जेव्हा मी रोहित शर्माला इतर कोणत्याही कार्यक्रमात भेटतो तेव्हा तो काय विचार करेल याचा मला विचार करण्याची गरज नाही.
Amit Mishra said “Rohit Sharma is same since the Day 1 meanwhile Virat Kohli changed alot after getting fame, power and captaincy” pic.twitter.com/zmo2kzIkuP
— i. (@ArrestPandya) July 15, 2024
माजी फिरकीपटूला विचारण्यात आले की कोहली बदलला आहे का? याला उत्तर देताना अमित मिश्रा म्हणाले, “विराट खूप बदलला आहे हे माझ्या लक्षात आले आहे. आम्ही बोलणे जवळजवळ बंद केले आहे. जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी आणि सत्ता मिळते, तेव्हा काही लोकांना वाटते की इतर काही हेतूने त्यांच्याकडे येतात.” तर रोहित शर्माबाबत बोलताना अमित मिश्रा म्हणला, “रोहित शर्मा सर्वोत्तम माणूस आहे, तो प्रत्येक खेळाडूला समानतेने पाहतो .तो मोठ्या भावासारखा आहे. मी रोहितला पहिल्यांदा जेव्हा पाहिलो होतो आणि आता पहातो तर तो सारखाच आहे. त्याच्यामध्ये काही बदल झाले नाही”.
महत्तवाच्या बातम्या-
आश्चर्यकारक..! ऑस्ट्रियाने क्रिकेटने रचला इतिहास, धावांचा पाठलाग करताना केला ऐतिहासिक विक्रम
युवराज-हरभजनच्या व्हिडिओने उडाली खळबळ, दिल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रोहित-विराटनंतर संघात त्यांची जागा कोण घेणार? भारताच्या माजी प्रशिक्षकानं दिली प्रतिक्रिया