भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने ‘किंग कोहली’ म्हणजेच विराट कोहलीसाठी एक भावुक पत्र लिहिले होते. या पोस्टमधून त्याने विराटच्या शानदार कारकिर्दीची प्रशंसा केली होती. अशातच आता भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या माजी वरिष्ठ खेळाडूला म्हणजेच युवराजला धन्यवाद दिला आहे.
मंगळवारी (२२ फेब्रुवारी) युवराजने (Yuvraj Singh) त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून विराट कोहलीवर (Virat Kohli) कौतुकाचा वर्षाव केला होता. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “विराटच्या कारकिर्दीला शिखरावर पोहोचताना पाहिलं आहे.” युवराजने विराटच्या शिस्त आणि खेळाबद्दलच्या समर्पणासाठी त्याचे कौतुक केले होते.
युवराजची पोस्ट
युवराजने आपल्या भावुक पोस्टमध्ये लिहिले होते की, “दिल्लीच्या लहान मुलाला, ज्याने सर्वोत्तम बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मी हा खास बूट तुला समर्पित करू इच्छितो. कर्णधार म्हणून तुझ्या सुवर्ण कारकिर्दीचे सेलिब्रेशन करत आहे, ज्याने जगभरातील लाखो चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले. मला आशा आहे की, तू जसा आहेस, तसाच राहो, जसा खेळतोय, तसाच खेळ आणि देशाला अभिमान वाटावा असं काम करत राहा.” आपल्या पत्रात युवराज विराटला “तू माझ्यासाठी नेहमी चीकूच राहशील आणि जगासाठी किंग कोहली,” असेही म्हणाला होता.
To the little boy from Delhi @imvkohli
I want to dedicate this special shoe to you,celebrating your career n time as captain which has brought smiles to millions of fans all over the world.
I hope you stay the way YOU are, play the way YOU do and keep making the country proud! pic.twitter.com/mwVPPh0JwU— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) February 22, 2022
विराट कोहलीने मानले आभार
“युवी पा या सुंदर गिफ्टसाठी धन्यवाद. कर्करोगातून तुमचे पुनरागमन केवळ क्रिकेटच नाही, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लोकांसाठी नेहमीच प्रेरणादायी असेल. मी तुम्हाला खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. मला माहितीये तुम्ही नेहमीच उदार आणि इतरांची काळजी घेणारे व्यक्ती आहात. मी तुम्हाला आनंदाच्या शुभेच्छा देतो,” असे विराटने ट्वीट करत युवराज सिंगचे आभार मानले.
Yuvi Pa thank you for this lovely gesture.Your comeback from cancer will always be an inspiration for people in all walks of life not just cricket. You have always been generous and caring for people around you.I wish you all the happiness,God bless @YUVSTRONG12. Rab rakha 🙏😊 pic.twitter.com/KDrd2JQCHU
— Virat Kohli (@imVkohli) February 23, 2022
सन २०११ मध्ये भारतीय संघाला विश्वचषक मिळवून देण्यात मोलाची भूमिका साकारणाऱ्या युवराजने या पत्रासोबतच विराटला एक ‘गोल्डन’ बूटही दिला.
विराटच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ९९ कसोटी सामने, २६० वनडे सामने आणि ९७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ५०.३९ च्या सरासरीने ७९६२ धावा, वनडेत ६८.०७ च्या सरासरीने १२३११ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२०त ५१.५० च्या सरासरीने ३२९६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-