पाकिस्तान संघ कोणत्याही स्पर्धेत भारताविरुद्ध मैदानात उतरतो तेव्हा वाद बघायला मिळतोच. यावेळी वाद भारतात होणाऱ्या ब्लाईंड टी20 विश्वचषकाबद्दल आहेे. मंगळवारी (दि. 6 डिसेंबर) एक बातमी समोर आली ज्यात म्हटले जात आहे की या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाकिस्तान संघातील खेळाडूंचा व्हिजा अजून मंजूर करण्यात आलेला नाही. मात्र, अहवालांनुसार असे सांगितले जात आहे की भारताच्या गृह मंत्रालयाकडून पाकिस्तान संघाला भारतात येऊन खेळण्याचा परवाना मिळाला आहे.
माध्यमांच्या अहवालानुसार, भारताच्या गृह मंत्रालयाने पाकिस्तान संघाला भारतात ब्लाईंड टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी सहभाग घेण्यासाठी परवानगी दिली आहे. मंत्रालयाने पाकिस्तान संघातील खेळाडी आणि कोचिंग स्टाफसहित एकूण 34 जणांना व्हिसा देण्यात आला आहे.
ब्लाईंड टी20 विश्वचषकाचे आयोजन भारतात होत आहे. ही स्पर्धा 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर या काळात होणार आहे. या स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने 15 डिसेंबरला खेळवले जाणार असून अंतिम सामना 17 डिसेंबरला खेळवला जाईल. ही स्पर्धेचे सामने भारताच्या दिल्ली, फरीदाबाद, मुंबई, इंदौर आणि बंगळूर या शहरांमध्ये खेळवले जाणार आहे. या स्पर्धेत भारत आणि अफगणिस्तान बरोबरच बांगलादेश नेपाळ, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ सहभाग नोंदवणार आहे.
ब्लाईंड टी20 विश्वचषकाची सुरुवात 2012मध्ये झाली होती. या स्पर्धेचे प्रथम आयोजन भारताच्या बंगळूरमध्ये करण्यात आलेले. पहिला ब्लाईंड टी20 विश्वचषक भारताने जिंकला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव करत हा विश्वचषक आपल्या नावावर कोरला होता. भारतीय संघाने आतापर्यंत दोन वेळा हा विश्वचषक जिंकला आहे. दुसऱ्या वेळी 2017मध्ये भारताने ही स्पर्धा जिंकलेली. 2017च्या ब्लाईंड टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने यावेळी देखील पाकिस्तान संघाचा पराभव केला. या सामन्यात भारताने 9 गडी राखत पाकिस्तानवर मात केलेली.(Indian Home Ministry has given clearance to Pakistan’s cricket team for visa to play in Blind T20 World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅच घेताना रोहित जखमी! झेल तर सुटलाच, पण बोटातून निघाले रक्त; टाके पडण्याची शक्यता
नाणेफेकीचा कौल यजमानांच्या पारड्यात! रोहितसेना दोन बदलांसह उतरणार मैदानात