वेळेनुसार भारतीय क्रिकेट संघाच्या प्रदर्शनात प्रगती होत गेली. गेल्या काही वर्षांमध्ये तर भारतीय संघ वेगळ्याच अंदाजात असल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे. वनडे क्रिकेटविषयी बोलायचं झालं तर, भारतीय संघाने जगभरातील दमदार संघांना मागे टाकत वनडे क्रिकेटमध्ये नवी ओळख निर्माण केली आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत गणले जाणारे रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या असे दमदार खेळाडू सध्याच्या भारतीय संघाचा भाग आहेत. पण, भविष्यात कोणत्या खेळाडूचा फॉर्म बिघडला किंवा इतर काही कारणांमुळे काही खेळाडूंना संघातून बाहेर केले जाऊ शकते. तसेच, आयपीएल किंवा देशांतर्गत क्रिकेटमधील शानदार भारतीय युवा खेळाडूंनाही वनडे संघात संधी दिले जाऊ शकते.
या लेखात, ५ वर्षांनंतर अर्थात २०२५मध्ये भारतीय वनडे संघाचा कर्णधार कोण बनेल?, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंची नावे असू शकतील?, याचा आम्ही आढावा घेतला आहे.
चला तर एकदा नजर टाकूया, २०२५ सालच्या भारतीय वनडे संघावर (Indian ODI Playing XI After 5 Years)
१. केएल राहुल (कर्णधार)
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलमध्ये भारतीय वनडे संघाचा कर्णधार बनण्याची क्षमता आहे. तो बऱ्याचदा शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीर फलंदाजांसोबत सामन्याची दमदार सुरुवात करताना दिसला आहे. २०१४ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या राहुलने खूप कमी वेळेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आजवर राहुलने ३२ वनडे सामने खेळले आहेत, दरम्यान त्याने ४ शतके आणि ७ अर्धशतके करत १२३९ धावा केल्या आहेत. तसेच, तो एक दमदार यष्टीरक्षकदेखील आहे. अलीकडच्या काळात तो बऱ्याच सामन्यांमध्ये यष्टीरक्षण करताना दिसला आहे. शिवाय, एमएस धोनीनंतर तो भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारीदेखील सांभाळू शकतो.
२. पृथ्वी शॉ
भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉला त्याच्या मोठमोठ्या शॉट्स मारण्याच्या कौशल्यासाठी ओळखले जाते. त्याने २०१८ मध्ये भारतीय कसोटी संघात तर २०२० मध्ये वनडे संघात पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत भारताकडून केवळ ४ कसोटी सामने खेळले आहेत, दरम्याने त्याने १३४ धावांच्या शतकी खेळीसह ३३५ धावा केल्या आहेत. श़ॉने आपल्या कसोटी कारकिर्दीची तर दमदार सुरुवात केली. पण वनडेत तो आपली कमाल दाशवू शकला नाही. त्याने वनडेत ३ सामन्यात केवळ ८४ धावा ठोकल्या आहेत.
असे असले तरी, तो भविष्यात आपल्या प्रदर्शनात सुधारणा करत वनडेत आपला जलवा दाखवू शकतो. शॉ फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही माहीर आहे. अनेकदा संघाच्या कठीण परिस्थितीत शॉने दमदार क्षेत्ररक्षकाची भूमिकाही निभावली आहे. त्यामुळे तो २०२५मध्येही भारतीय वनडे संघाचा एक दमदार खेळाडू म्हणून नावारुपाला येऊ शकतो.
३. विराट कोहली
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेस आणि त्याच्यातील खेळण्याच्या स्फुर्तीला पाहून असे वाटत नाही की एवढ्या लवकर क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. ३१ वर्षीय विराट हा सध्या भारतीय वनडे संघातील सिनियर खेळाडू आहे. त्याच्यामध्ये कोणत्या वेळी संघासाठी कोणता निर्णय घ्यायचा, याची चांगली समज आहे. पण एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळलेला हा खेळाडू भविष्यात आपली नेतृत्वाची जबाबदारी केएल राहुलच्या खांद्यावर सोपवू शकतो.
असे असले तरी, जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणला जाणारा विराट हा २०२५मध्येही वनडे संघात आपल्या फलंदाजीने चमकदार कामगिरी करताना दिसेल. आजवर विराटने वनडेत २४८ सामने खेळत ४३ शतकांच्या मदतीने ११८६७ धावा केल्या आहेत.
४. श्रेयस अय्यर
भारतीय वनडे संघातील चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार श्रेयस अय्यरने आपल्या फलंदाजीने आजवर अनेक गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्याला भारतीय संघात पदार्पण करुन केवळ ३ वर्षे झाली आहेत. पण त्याची भारतीय संघातील दमदार खेळाडूंच्या गर्दीत वेगळी ओळख आहे.
आजवर अय्यरने भारताकडून २१ वनडे सामने खेळत २ अर्धशतके ठोकत ४१७ धावा केल्या आहेत. तो ज्याप्रकारे फलंदाजी करतो, त्याला पाहून असे वाटते की येत्या काही वर्षात त्याची भारतीय संघातील दिग्गज फलंदाजांमध्ये गणना केली जाऊ शकते. तो २०२५मध्ये भारतीय वनडे संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून नावारुपाला येऊ शकतो.
५. रिषभ पंत
भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतने भारताकडून खेळताना दमदार फलंदाज आणि उत्त्कृष्ट यष्टीरक्षकाची भूमिका बजावली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांमध्ये गणल्या जाणाऱ्या एमएस धोनीला न करता आलेले काही विक्रम पंतने आपल्या नावावर केले आहेत. २०१८ पासून तो भारतीय संघाचा भाग आहे. दरम्यान त्याने १६ वनडे सामने खेळत सर्वाधिक ७१ धावांसह ३७४ धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीमुळे त्याच्या यष्टीरक्षणाचा मार्ग रिकामा झाला आहे. तो भविष्यात भारतीय वनडे संघाचा नियमित यष्टीरक्षक बनू शकतो.
६. हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्याला हा जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक आहे. आयपीएलमधील शानदार प्रदर्शाच्या जोरावर पंड्याला भारतीय संघात स्थान मिळाले. त्याने भारतीय संघात येताच आपल्या जोरदार शॉट्स मारण्याच्या क्षमतेने आणि स्पिन गोलंदाजींने स्वत: एक दमदार अष्टपैलू क्रिकेटपटू असल्याचे सिद्ध करुन दाखवले.
आजवर त्याने वनडेत ५४ सामने खेळत ९५७ धावा आणि आणि ५४ विकेट्स घेतल्या आहेत. तो येत्या काही वर्षात आपल्या प्रदर्शनात वाढ करत अजून चांगले प्रदर्शन करु शकतो. त्यामुळे तो पाच वर्षांनंतर भारतीय वनडे संघाचा अविभाज्य भाग असेल.
७. वॉशिंग्टन सुंदर
भारतीय संघाचा फिरकीपटू जो फलंदाजी विभागातही चांगली कामगिरी करण्याची क्षमता राखतो, तो म्हणजे वॉश्गिंटन सुंदर. त्याला भारतीय संघात पदार्पण करुन नुकतीच ३ वर्षे झाली आहेत. पण तमिळनाडूच्या या खेळाडूला भारताकडून खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. त्याने टी२०त भारताकडून २२ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १९ विकेट्ही चटकावल्या आहेत.
पण वनडेत मात्र त्याला एका सामन्यातच संधी मिळाली. त्यातही त्याने जास्त चांगले प्रदर्शन न केल्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आले. पण, येत्या काही वर्षात तो भारतीय वनडे संघात पुनरागमन करु शकतो आणि प्रदर्शनाने संघातील आपले स्थान पक्के करु शकतो.
८. कुलदिप यादव
चायनामॅन म्हणून ओळखला जाणारा भारतीय गोलंदाज कुलदिप यादव गेल्या ३ वर्षांपासून भारतीय वनडे संघाकडून खेळत आहे. त्याची वनडेतील आकडेवारीही उल्लेखनीय आहे. ६० वनडे सामने खेळत यादवने १०४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.
यादव हा केवळ २५ वर्षाचा आहे. तरीही त्याची आकडेवारी अनेक दिग्गज गोलंदाजांना लाजवावी अशी आहे. अजून काही वर्षांमध्ये तो भारतीय संघातील अनुभवी गोलंदाजी होऊ शकतो आणि आपल्या गोलंदाजी प्रदर्शनाने भारताला एकहाती सामने जिंकून देऊ शकतो.
९. जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराहला मॅच विनर गोलंदाज म्हणून संबोधले जाते. जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजदेखील बुमराहच्या यॉर्करचा सामना करण्यात अपयशी ठरले आहेत. २०१६पासून भारतीय वनडे संघाचा भाग असणाऱ्या बुमराहने ६४ सामन्यात १०४ विकेट्सची आपल्या खात्यात नोंद केली आहे. शिवाय त्याचे वयही कमी आहे. तो केवळ २६ वर्षाचा आहे. त्यामुळे तो कमीत कमी ७-८ वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसू शकतो.
१०. नवदीप सैनी
हरियाणाच्या वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने त्याच्या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात पदार्पण केले होते. गेल्या एका वर्षात या गोलंदाजाने ९ वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १७ धावा देत ३ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीसह १३ विकेट्ची आपल्या खात्यात नोंद केली आहे. तो २०१५मध्येही भारतीय वनडे संघाचा भाग असेल.
११. खलील अहमद
२०१८मध्ये हाँग काँगविरुद्धच्या सामन्यातून भारतीय वनडे संघात पदार्पण करणाऱ्या खलील अहमदने भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजवर त्याने ११ वनडे सामने खेळत १५ विकेट्स चटकावल्या आहेत. खलीलकडून संघाला अजून चांगल्या प्रदर्शानाची अपेक्षा आहे. त्यामुळे त्याला अजून काही वर्षे भारताकडून खेळण्याची संधी दिली जाऊन शकते.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये २० पेक्षा कमी चेंडूत २ अर्धशतके ठोकणारे ४ फलंदाज; या भारतीयाचा आहे समावेश
‘धोनी रोज पितो ५ लिटर दूध’ सारख्या लहानपणी तुम्ही ऐकलेल्या क्रिकेटबद्दलच्या ५ खोट्या गोष्टी
३८ वर्षीय ३ खेळाडू जे करु शकतात आयपीएलमध्ये धमाका
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेबाबत बीसीसीआय सज्ज, ही कंपनी करणार २० हजारपेक्षा अधिक चाचण्या
एकेकाळी कर्णधारपदावरून काढत वगळले होते संघातून, आता त्याच खेळाडूने ठोकले त्रिशतक