इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने कसोटी पदार्पण केले. मुकेशने वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केले. मुकेशला अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने 308 क्रमांकाची टोपी दिली. विशेष म्हणजे, पदार्पणाच्या रात्रीच मुकेश कुमारने आईला फोन केला. फोनवर मुकेश कुमारची आईसोबत चर्चा झाली. आता याचबद्दल त्याने भाष्य केले आहे. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुकेश कुमार (Mukesh Kumar) हा बिहारच्या गोपालगंज गावातील रहिवासी आहे. मुकेशला भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. रिक्षाचालक वडिलांनी संघर्ष करून मुकेशला इथपर्यंत पोहोचवले. 29 वर्षीय मुकेश कुमार बंगालकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. त्याला मागील हंगामात आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या ताफ्यात घेतले होते. मुकेशने पहिल्या; आयपीएल हंगामात आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. सध्या तो भारतीय संघासोबत वेस्ट इंडिजमध्ये आहे. तिथे वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.
बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर मुकेश कुमार (Mukesh Kumar) याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पदार्पणानंतरचा आहे. सायंकाळी जेव्हा मुकेश हॉटेलमधील आपल्या खोलीत पोहोचला, तेव्हा तो 308 नंबरची जर्सी उचलून म्हणतो की, “आज मला ही 308 क्रमांकाची टोपी मिळाली, जी अश्विन भाईने दिली. आज माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता. इतक्या वर्षांच्या मेहनतीचे फळ मला आज मिळाले.” यानंतर मुकेश आईला फोन लावतो.
https://www.instagram.com/reel/Cu-EHANN021/?utm_source=ig_embed&ig_rid=510d1441-f338-4f24-ae14-d4aff2a471d4
मुकेशच्या आईचा आनंद गगनात मावेना
मुकेश कुमार फोनवर आईला सांगतो की, “इतक्या वर्षांपासून तुम्ही माझ्यासाठी जे पूजाअर्चना आणि मेहनत घेतली, त्याचे फळ आज मला मिळाले आहे. मला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली.” यानंतर आईदेखील म्हणते की, “मला खूप आनंद झाला.” आई म्हणते की, “असाच पुढे जात राहशील, माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे.” आईसोबत बोलल्यानंतर मुकेश सांगतो की, आईसोबत काय बोलणं झालं. आईसोबत बोलताना मुकेशचे हात थरथर कापत होते. त्याला आनंद कशाप्रकारे व्यक्त करावा, हेच कळत नव्हते.
दिल्लीने 5.50 कोटींमध्ये केलेले ताफ्यात सामील
मुकेश कुमार याला देशांतर्गत क्रिकेटमधील शानदार प्रदर्शनामुळे आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने लिलावात 5.50 कोटी रुपयात ताफ्यात सामील केले. मुकेशने आयपीएल 2023 या आपल्या पहिल्या हंगामात 10 सामन्यात गोलंदाजी करताना 10.52च्या इकॉनॉमी रेटने 7 विकेट्स घेतल्या आहेत. मुकेश हा गोपालगंज जिल्ह्याचा पहिला खेळाडू आहे, ज्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर लगेच मुकेशला भारतीय संघातही जोडले गेले. आता त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. (indian pacer mukesh kumar phone call mother after debut india vs west indies 2nd test)
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! आशिया चषकाच्या सेमीफायलमध्ये भिडले भारत-बांगलादेशचे खेळाडू, 45 सेकंदाचा व्हिडिओ पाहाच
अमेरिकेत घोंगावलं रसेल नावाचं वादळ! 6 सिक्स मारत चोपल्या 70 धावा, तरीही संघावर पराभवाची नामुष्की