जवळचा व्यक्ती जगातून कायमचा सोडून गेल्यावर होणारं दु:ख हे तोच व्यक्ती समजू शकतो. असे असूनही दु:ख विसरून देशासाठी दमदार कामगिरी करणे, यावरून त्या खेळाडूचे खेळासाठी असलेलं समर्पण दिसून येते. मागील महिन्यात 23 फेब्रुवारीला भारतीय संघाचा स्टार गोलंदाज उमेश यादव याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र, या घटनेच्या 10 दिवसांच्या आतच उमेश देशासाठी मैदानावर परतला. त्याने पुनरागमन करताच शानदार विक्रम करून दाखवला. तो कपिल देव, जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांसारख्या दिग्गजांच्या यादीत सामील झाला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून (दि. 1 मार्च) इंदोर येथे सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताचा डाव 33.2 षटकात 109 धावांवर संपुष्टात आला होता. भारताला 100 धावांचा आकडा पार करण्यातही उमेश यादव (Umesh Yadav) याने मोलाचा वाटा उचलला. त्याने 13 चेंडूत 17 धावांचे योगदान दिले. त्यात 1 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. यानंतर उमेशने गोलंदाजीतूनही दम दाखवून दिला.
Bowled!@y_umesh cleans up Mitchell Starc and picks up his 💯th wicket in India.
Well done, Umesh 💪💪#INDvAUS pic.twitter.com/XNWhdTYQQ2
— BCCI (@BCCI) March 2, 2023
ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात फलंदाजीला उतरल्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उमेश यादव याने 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 5 षटके गोलंदाजी करताना 12 धावा खर्च करत 3 विकेट्स नावावर केल्या. या विकेट्स घेताच उमेश यादवच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. उमेश मायदेशात कसोटीत खेळताना 100 हून अधिक विकेट्स घेणारा भारताचा पाचवा खेळाडू बनला. त्याच्या नावावर 101 कसोटी विकेट्सचा समावेश झाला.
मायदेशात कसोटीत खेळताना भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वलस्थानी कपिल देव (Kapil Dev) आहेत. त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक 219 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) असून त्यांच्या नावावर 108 विकेट्सचा समावेश आहे. तसेच, संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी असलेल्या झहीर खान आणि ईशांत शर्मा यांच्या नावावर प्रत्येकी 104 विकेट्स आहेत. अशात झहीर आणि ईशांतचा विक्रम मोडण्यासाठी उमेशला आणखी 4 विकेट्सची गरज आहे. (Indian pacers with 100 Plus Test wickets at home Umesh Yadav join club)
मायदेशात कसोटीत 100हून अधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
219 विकेट्स- कपिल देव
108 विकेट्स- जवागल श्रीनाथ
104 विकेट्स- झहीर खान
104 विकेट्स- ईशांत शर्मा
101 विकेट्स- उमेश यादव*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटीत नवा जगज्जेता बनण्याच्या दिशेने अश्विनची वाटचाल, कपिल पाजींच्या ‘तो’ विक्रमही काढला मोडीत
भारताचा दमदार खेळाडू सर्जरीसाठी न्यूझीलंडला होणार रवाना! आर्चरला फिट करणाऱ्या सर्जनला केलंय पाचारण