---Advertisement---

हे ५ खेळाडू संघात असले म्हणजे सामना टाय व्हायचे चान्सेस वाढलेच समजा

On: मंगळवार, एप्रिल 28, 2020 1:40 PM
---Advertisement---

वनडे क्रिकेटमध्ये विजय, पराजय, अनिर्णित किंवा बरोबरीत असे सामन्याचे चार निकाल लागतात. विजयाला won, पराभवाला lost, अनिर्णितला No Result तर बरोबरीतला Tied असे इंग्रंजीत म्हणतात.

अनेक जिंकलेले सामने हे अतिशय चुरशीचे होतात. परंतु खेळाडूंच्या बऱ्याच वेळा संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळतात जेव्हा सामना टाय अर्थात बरोबरीत सुटतो.

सामना बरोबरीत सुटण्याचा कधी कधी संघांना जोरदार फटकाही बसला आहे. भारतीय संघाने सर्वाधिक वनडे सामने खेळले आहेत. यात संघाने ९८७ सामन्यात ५१३ विजय, ४२४ पराभव, ४१ अनिर्णित सामने तर ९ टाय सामने खेळले आहेत.

परंतु जगात सर्वाधिक टाय सामने खेळण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिज संघाच्या नावावर आहे. त्या संघाने तब्बल १० सामने टाय खेळले आहेत तर भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड संघाने प्रत्येकी ९ सामने टाय खेळले आहेत. ३७६ वनडे खेळणारा बांगलादेश संघ मात्र एकाही टाय सामन्यात खेळला नाही.

भारताच्या ९ बरोबरीत सुटलेल्या सामन्यांपैकी ६ सामन्यात एमएस धोनी खेळला आहे. जगात सर्वाधिक टाय सामने खेळण्याचा पराक्रम संयुक्तपणे धोनी, वसिम अक्रम, आमीर सोहेल व इंझमाम उल हक यांच्या नावावर आहे. त्यांनी प्रत्येकी ६ सामने टाय खेळले आहेत.

टाय सामन्यात सर्वाधिक चांगली सरासरी एमएस धोनीची राहिली आहे. धोनीने या ६ टाय सामन्यात ६१.२५च्या सरासरीने २४५ धावा केल्या आहेत.

भारताने १९९१, १९९३, १९९७, २०११(दोन सामने) २०१२, २०१४ आणि २०१८ (दोन सामने) असे एकुण ९ वन-डे सामने बरोबरीत सोडवले. यातील २०११ पासूनच्या सर्व सामन्यात धोनी संघाचा भाग होता.

वनडेत सर्वाधिक टाय सामने खेळणारे खेळाडू

६- आमीर सोहेल, एमएस धोनी, इंझमाम उल हक, वसिम अक्रम

५- मार्क बाऊचर, एडम गिलख्रिस्ट, रविंद्र जडेजा, जॅक कॅलिस, विराट कोहली, शाॅन पोलाॅक, रिकी पाॅटींग, सचिन तेंडूलकर, स्टिव वाॅ

वनडेत सर्वाधिक टाय सामने खेळणारे भारतीय खेळाडू

६ – एमएस धोनी

५- रविंद्र जडेजा, सचिन तेंडूलकर, विराट कोहली

३- आर आश्विन, मोहम्मद अझरुद्दीन, सुरेश रैना, रोहित शर्मा, जवागल श्रीनाथ

ट्रेंडिंग घडामोडी-

-हर्षा भोगलेंचं नाव ऐकल्यावर तुमच्या डोक्यात पहिलं काय येतं? मांजरेकर म्हणतात…

-मॅच हारल्यावर धोनी काय करतो? त्या खेळाडूने अखेर जगाला सांगतिला धोनीचा तो ‘राज’

-विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायला पैसे नव्हते म्हणून लतादीदींनी गायलं होतं गाणं

 

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment