दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम सामना केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघांना सध्या विजयाची समान संधी आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका (sa vs Ind 3rd test) संघासमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान दिले आहे. दरम्यान, या सामन्यात खेळाडूंमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे दिसले.
दक्षिण आफ्रिका संघाला तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत २ बाद १०१ धावा करण्यात यश आले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी अखेरच्या दोन दिवसात १११ धावा करायच्या आहेत. तर भारतीय संघाला विजयासाठी ८ गडी बाद करायचे आहेत. दरम्यान, या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (१३ जानेवारी) असा काही प्रकार घडला ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
केपटाऊन कसोटी सामना सध्या रोमांचक स्थितीत आहे. या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवण्यासाठी समान संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पण, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) पायचीत झाल्यानंतर डीआरएसमध्ये पंचांचा निर्णय बदलण्यात आला होता. त्यामुळे भारतीय खेळाडू संतापले आणि त्यांनी स्टंप माईकमध्ये प्रसारणकर्ते सुपरस्पोर्टला खरे खोटे सुनावले आहे.
तर झाले असे की, आर अश्विनने (R Ashwin) टाकलेला चेंडू डीन एल्गरच्या पॅडला जाऊन लागला. त्यावेळी सर्व खेळाडूंनी पंचांकडे जोरदार मागणी केली होती. पंच इरासमस यांनी देखील त्याला बाद घोषित केले होते. त्यावेळी डीन एल्गरने डीआरएसची मागणी केली होती. डीआरएस घेतला असता, चेंडू यष्टीच्या वरून जात असल्याचे दिसून आले. जे पाहून भारतीय खेळाडू भलतेच नाराज झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पंचांना आपला निर्णय बदलावा लागला.
काय म्हणाले भारतीय खेळाडू
क्रिकबजच्या वृत्तानुसार, भारतीय खेळाडूंनी स्टंप माईकमध्ये सुपर स्पोर्टला खरे खोटे सुनावले. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला की, “फक्त विरोधी संघावर नव्हे, तर स्वतःच्या संघावरही लक्ष द्या, नेहमी दुसऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असता.” तर आर अश्विन म्हणाला की, “सुपरस्पोर्ट तुम्हाला विजय मिळवण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल. ” केएल राहुल (kl rahul) म्हणाला की, “संपूर्ण देश ११ खेळाडूंविरुद्ध खेळत आहे.” तसेच विराट कोहली पुढे म्हणाला की, “चांगलं केलं डीआरएस, खूप चांगलं केलं.”
https://twitter.com/The_Official_18/status/1481656742543228928
Drama with DRS. (Source – Cricbuzz) pic.twitter.com/OFhMiaZP2e
— Johns. (@CricCrazyJohns) January 13, 2022
Virat Kohli walked up to the stumps and said: "Focus on your team as well and not just the opposition. Always trying to catch people". Virat Kohli speaking right into the stump mic indicating that the DRS is definitely rigged to favour South Africa. #INDvsSA #ViratKohli pic.twitter.com/oGF13DeGoZ
— Avish Sidhwani (@SidhwaniAvish) January 14, 2022
या सामन्यात भारताचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला होता. तर दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात २१० धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे भारताला १३ धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद १९८ धावा करत १३ धावांच्या आघाडीसह दक्षिण आफ्रिकेला २१२ धावांचे आव्हान दिले.
महत्वाच्या बातम्या :
कोण आहे हा युवा वादळी फलंदाज? ज्याच्यामागे धावतायेत चार-चार आयपीएल संघ
दक्षिण आफ्रिकेचा सुपरमॅन! किगन पीटरसनने हवेत झेपावत घेतला पुजाराचा भन्नाट एकहाती झेल
हे नक्की पाहा :