---Advertisement---

शाहरुखपासून अंबानींपर्यंत, कोणाच्या मालकीचा आहे तुमचा आवडता IPL संघ?

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक आहे. या लीगमध्ये खेळाडूंसोबतच संघमालकांच्याही नावांची मोठी चर्चा असते. सध्या आयपीएलमध्ये एकूण 10 संघ खेळतात आणि प्रत्येक संघाचे वेगवेगळे मालक आहेत. याबातमद्वारे जाणून घेऊया की, आयपीएल सर्व संघाचे कर्णधार कोण आहेत?

कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
केकेआरचा संघ बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला, आणि तिचे पती जय मेहता यांच्या मालकीचा आहे. त्यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या कंपनीमार्फत संघ चालवला जातो.

मुंबई इंडियन्स (MI)
मुंबई इंडियन्सचा संघ उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्या मालकीचा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्फत हा संघ व्यवस्थापित केला जातो आणि तो आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघांपैकी एक मानला जातो.

राजस्थान रॉयल्स (RR)
राजस्थान रॉयल्सचा संघ मनोज बडाले यांच्या नेतृत्वाखाली आहे. तसेच, मीडिया टायकून लचलन मर्डोक यांचीही गुंतवणूक आहे.

सनरायझर्स हैदराबाद (SRH)
हा संघ कलानिधी मारन यांच्या मालकीच्या सन टीव्ही नेटवर्क्सच्या अंतर्गत आहे. सनरायझर्स हैद्राबादने 2016 मध्ये आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले होते.

दिल्ली कॅपिटल्स (DC)
दिल्ली कॅपिटल्सचा संघ सज्जन जिंदाल आणि पार्थ जिंदाल यांच्या जेएसडब्लू ग्रुप आणि जीएमआर ग्रुपच्या संयुक्त मालकीखाली आहे.

पंजाब किंग्ज (PBKS)
पंजाब किंग्ज हा संघ प्रीती झिंटा, मोहित बर्मन, नेस वाडिया, आणि करन पॉल यांच्या संयुक्त मालकीचा आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (CSK)
चेन्नई सुपर किंग्ज हा संघ एस श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट लिमीटेडच्या मालकीचा आहे. हा संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक यशस्वी संघांपैकी एक आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा संघ युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मालकीचा आहे. हा संघ विराट कोहली आणि एबी डिविलियर्ससारख्या खेळाडूंमुळे प्रसिद्ध आहे.

गुजरात टायटन्स (GT)
2022 मध्ये पदार्पण करताच आयपीएल जिंकलेल्या गुजरात टायटन्स संघाचे मालक सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स आहेत. ही एक आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कंपनी आहे.

लखनऊ सुपर जायंट्स (LSG)
लखनऊ सुपर जायंट्स संघ संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी ग्रुपच्या मालकीचा आहे.

आयपीएल संघांचे मालक विविध क्षेत्रांतून आलेले आहेत. बॉलिवूड स्टार्सपासून मोठ्या उद्योगपतींपर्यंत. प्रत्येक संघाच्या मागे मोठी व्यावसायिक रणनीती आणि मार्केटिंग आहे, जे आयपीएलला अधिकाधिक लोकप्रिय बनवते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---