आयसीसी 2019 विश्वचषकासाठी आता 2 महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे सर्वच संघांनी संघबांधणीची सुरुवात केली असून या महिन्यात सर्व संघांना त्यांच्या 15 जणांच्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. कारण 25 एप्रिल ही विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ जाहीर करण्याची अंतिम तारिख आहे.
पण या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा ही 20 एप्रिल किंवा त्याआधीच होणार असल्याचे भारतीय क्रिकेट निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले आहे.
प्रसाद आंध्रप्रदेशमधील श्रीकालहस्ती शहरातील एका मंदिरात दर्शनासाठी गेले असताना त्यांनी या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा 20 एप्रिल किंवा त्याआधी होईल.’
‘मला विश्वास आहे की आम्ही एक चांगल्या संघाची घोषणा करणार आहोत. आम्ही यावर जवळजवळ दिड वर्षांपासून काम करत आहोत. आम्ही सर्व खेळाडूंचे निरिक्षण केले आहे. तसेच वेगवेगळे पर्याय तपासले आहेत.’
‘आम्हाला खात्री आहे की आम्ही जो संघ निवडू तो नक्कीच इंग्लंडमध्ये 2019 चा होणारा विश्वचषक जिंकेल.’
ही विश्वचषक स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार असून 30 मेपासून या स्पर्धची सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–…आणि धोनी आऊट होता होता वाचला, पहा व्हिडिओ
–रोहित शर्मानंतर आता अजिंक्य रहाणेलाही झाला लाखो रुपयांचा दंड, जाणून घ्या कारण
–कोहलीच्या टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा कायम, सलग तिसऱ्यांदा पटकावली मानाची गदा






