टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) भारताची सुरुवात काही खास राहिली नाही. मात्र, निराशाजनकही नव्हती. पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीचा पहिला राऊंड पार पडला. या शर्यतीत केनिया, इथिओपिया आणि इजिप्तच्या ऍथलिट्ससमोर भारतीय अविनाश साबळेला जास्त संधीच दिली नाही. त्यामुळे त्याला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. मात्र, असे असले तरीही अविनाशने जबरदस्त कामगिरी करत एक राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे.
अविनाशने दमदार प्रदर्शन करत ८:१८:१२ या वेळेत ही शर्यत पूर्ण केली. यासोबतच त्याने सर्वात कमी वेळात ही शर्यत पूर्ण करण्याच्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. त्याने ८:२०:२० हा विक्रम मोडला आहे. (Avinash Mukund Sable misses out on qualification)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Athletics
Men's 3000m Steeplechase Round 1 Heat 2 Results@avinash3000m sets a new National Record as he finishes 7th fastest clocking 8:18.12. Spirited effort by the champ 👏🙌👟 #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/hdnCjE0RzK— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2021
हीट-२ मध्ये अविनाशला ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तो १००० मीटर संपेपर्यंत सहाव्या स्थानी होता. त्यानंतर २००० मीटर पूर्ण होईपर्यंत एक स्थान खाली घसरला आणि सातव्या क्रमांकावर पोहोचला.
या शर्यतीमध्ये एकूण ३ हीट असतात. प्रत्येक हीटमध्ये अव्वल ३ स्पर्धकांना पुढील फेरीत प्रवेश मिळतो.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना