यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटीत त्याने लागोपाठ दोन द्विशतके केली. या दोन द्विशतकांनंतर शुक्रवारी (23 फेब्रुवारी) सुरू झालेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात देखील जयस्वालकडून शतकाची अपेक्षा होती. पण यावेळी त्याने वैयक्तिक 73 धावा करून विकेट गमावली. असे असले तरी सलामीवीर फलंदाजाच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला.
रांची कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअंती इंग्लंडकडे 134 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारताने 7 विकेट्सच्या नुकसानावर 219 धावा केल्या. एकटा सलामीवीर यशस्वी जयस्वाल सोडला, तर इतर सर्व भारतीय खेळाडू एकापाठोपाठ स्वस्तात बाद होत गेले. असे असेल तरी जयस्वालने केलेल्या अर्धशतकानंतर तो भारतासाठी एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा डावखुरा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या नावावर होता. गांगुलीने 2007 साली पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत 534 धावा केल्या होत्या. आता जयस्वालने इंग्लंडविरुद्दच्या या कसोटी मालिकेत शनिवारी आपल्या धावांचा आकडा 618 पर्यंत नेला. (Indian team has never had such a left handed batsman before! Yashasvi broke Ganguly’s big record)
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे डावखुरे भारतीय खेळाडू
589* – यशस्वी जयस्वाल विरुद्ध इंग्लंड, 2024
534 – सौरव गांगुली विरुद्ध पाकिस्तान, 2007
463 – गौतम गंभीर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2008
445 – गौतम गंभीर विरुद्ध न्यूझीलंड, 2009
438 – नारी कंत्राटदार विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1959-60
रांची कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन
भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप (पदार्पण), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
मोठा भाऊ भारतासाठी खेळत असताना मुशीर खाननं द्विशतक! रणजीच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई सुस्थितीत
दुसऱ्या दिवसाअंती इंग्लंडकडे 134 धावांची लीड; जयस्वालचे महत्वाचे योगदान, सरफराजला अपयश