आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून सुरू होणार आहे. त्यासाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ मुंबईहून दुबईला रवाना झाला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये रोहित अँड कंपनी आणि सपोर्ट स्टाफ दुबईला जाणारी विमान उड्डाणासाठी विमानतळावर चेक इन करताना दिसत आहेत.
यंदाची चॅम्पियन्स ट्राॅफी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जाणार आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईच्या मैदानावर खेळणार आहे. भारतीय संघाचे सर्व ग्रुप अ सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील, तर उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये होतील.
संघाची सुरुवातीची योजना दोन गटात दुबईला जाण्याची होती, परंतु गेल्या महिन्यात जारी केलेल्या बीसीसीआयच्या धोरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संघ त्यांच्या परदेश दौऱ्यांसाठी एकत्र प्रवास करत आहे. विमानतळावरून खेळाडूंचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) सर्व मोठे खेळाडू दिसत आहेत.
आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती
#WATCH | Mumbai: The first batch of the Indian Cricket team departs for Dubai to participate in the ICC Champions Trophy.
All matches of Team India will be held in Dubai, while the rest will take place in Pakistan. The ICC Champions Trophy will begin on February 19 and will… pic.twitter.com/C4VdRPddyn
— ANI (@ANI) February 15, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियावर बुमराहच्या दुखापतीचा काय परिणाम होईल? माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान
पाकिस्तानमध्ये कोहलीची क्रेझ! ‘RCB-RCB’च्या घोषणांनी बाबर आझमला टेन्शन?
“क्रिकेटर आहोत, नट नव्हे” अश्विनच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चा






