---Advertisement---

दुसऱ्या सामन्यात आणखी तयारीनिशी उतरणार भारतीय संघ, रणतुंगा यांना देणार चोख प्रत्युत्तर

On: सोमवार, जुलै 19, 2021 4:42 PM
---Advertisement---

शिखर धवनच्या नेतृत्वात व दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या युवा संघाने दौऱ्यावरील पहिल्या वनडे सामन्यात ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. यासोबतच भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दौरा सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी भारतीय संघाला ‘ब संघ’ म्हणून हिणवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी (२० जुलै) होणाऱ्या पुढील सामन्यात आणखी तयारीनिशी उतरत भारतीय संघ विजय मिळविण्याचा व मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल.

भारतीय संघ विनाबदल उतरू शकतो मैदानात
वनडे मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. त्यानुसार भारतीय संघ पहिल्या सामन्यातील नगन या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल.

पहिल्या सामन्यात भारताचे अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल व कुलदीप यादव हे बऱ्याच कालावधीनंतर एकत्र खेळले. दोघांनी देखील अत्यंत कंजूस गोलंदाजी करत प्रत्येकी दोन बळी मिळवले. भुवनेश्वर कुमार व दीपक चाहर या वेगवान गोलंदाजांनी देखील बळी मिळवले. कृणाल व हार्दिक पंड्या या अष्टपैलू बंधूंना फलंदाजी करण्याची संधी मिळाली नसली तरी, त्यांनी गोलंदाजीत आपले योगदान दिले. अंतिम षटकात भारतीय गोलंदाजांनी काहीशा धावा दिल्या. परंतु, दुसऱ्या सामन्यात या चुका भरून काढण्याचा प्रयत्न गोलंदाज करतील.

फलंदाजांची तुफानी फटकेबाजी
श्रीलंकेला दिलेले २६३ धावांचे आव्हान भारतीय फलंदाजांनी अगदीच छोटे ठरवले. युवा पृथ्वी शॉ याने केवळ २४ चेंडूत ४३ तर, पदार्पण करणाऱ्या इशान किशनने ४२ चेंडूत ५९ धावा चोपल्या. दुसरा पदार्पणवीर सूर्यकुमार यादव यानेदेखील नाबाद ३१ धावांचे योगदान दिले. प्रथमच नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनने जबाबदारीने खेळ करत नाबाद ८६ धावांची खेळी केली.

या सर्व आकडेवारीमुळे भारतीय संघ दुसऱ्या सामन्यातही बिलकुल हयगय न करता विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल. या सामन्यात भारतीय संघ संघात बदल करण्याची बिलकुल शक्यता नाही.

दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), मनिष पांडे, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्टुअर्ट ब्रॉड की हार्दिक पंड्या; कोणाचा हेडबँड लूक हटके? दिग्गज खेळाडूने दिले ‘हे’ उत्तर

शॉ-इशानच्या विस्फोटानंतर ‘या’ दोन अनुभवी खेळाडूंची वाढली धडधड, टी२० विश्वचषकातील स्थान घेऊ शकते धोक्यात

वाढदिवस विशेष: दुसरा हर्षा भोगले होणे नाही…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---