टी-२० विश्वचषकातील खराब प्रदर्शनानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्न असेल. विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १७ नोव्हेंबरपासून टी-२० मालिका खेळली जाणार आहे. भारतीय संघासाठी या मालिकेपासून एका नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे. संघाला या मालिकेसाठी राहुल द्रविड यांच्या रुपात नवीन मुख्य प्रशिक्षक आणि रोहित शर्माच्या रुपात नवीन टी-२० कर्णधार मिळाला आहे. या दोघांसाठी भारतीय संघासोबत एका नवीन भूमिकेतील हे त्यांचे पहिलेच अभियान आहे. तत्पूर्वी या मालिकेसाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे.
या मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या सराव सत्रातील एक खास व्हिडिओ समोर आला आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत टी-२० संघाचा नवीन कर्णधार रोहित शर्मासह नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील स्वतः गोलंदाजी करताना दिसत आहेत. रोहित शर्मा सराव सत्रादरम्यान चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे आणि तो मोठे मोठे शॉट खेळत आहे.
रोहित टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यात चांगली खेळी करू शकला नव्हता, पण त्यानंतर तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. त्याचा तोच चांगला फॉर्म या टी-२० मालिकेतही कायम असेल अशी चाहते अपेक्षा व्यक्त करत आहेत. तसेच प्रशिक्षक राहुल द्रविड स्वतः सराव सत्रात थ्रो डाउन करताना दिसत आहेत.
New roles 👌
New challenges 👊
New beginnings 👍Energies were high yesterday on Day 1 at the office for #TeamIndia T20I captain @ImRo45 & Head Coach Rahul Dravid. 👏 👏#INDvNZ pic.twitter.com/a8zlwCREhl
— BCCI (@BCCI) November 16, 2021
📸 📸: Some snapshots from #TeamIndia's 1⃣st practice session in Jaipur last evening. #INDvNZ pic.twitter.com/LcQsQVVNuR
— BCCI (@BCCI) November 16, 2021
टी-२० मालिकेदरम्यान न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलिम्यनसन विश्रांतीवर आहे. तर त्याच्या जागी टिम साउदी संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-२० मालिकेनंतर होणाऱ्या कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विलियम्सनने विश्रांती घेतल्याचे सांगितले जात आहे. विराट कोहलीलाही या टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही तो खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात तो संघासोबत सामील होईल.
दरम्यान, विराटने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातच घोषित केले होते की, तो टी-२० विश्वचषकानंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. असे असले तरी, भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अजूनही त्याच्याकडेच आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत दौऱ्यावर आलेला न्यूझीलंड संघ राहणार नाही क्वारंटाईन, ‘हे’ आहे कारण
वनडे क्रिकेटमध्ये ‘नर्व्हस नाइंटी’चे शिकार होणाऱ्या अनलकी फलंदाजांची संपूर्ण यादी