सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला गेला. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशवर 188 धावांनी विजय मिळवला. या दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. या आघाडीमुळे भारताला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत स्थान भक्कम केले आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागा मिळवण्यासाठी भारतीय संघाला बांगलादेश विरुद्धची ही कसोटी मालिका 2-0ने जिंकावी लागेल. तसेच आगामी मालिकेत मोठ्या फरकाने सामने जिंकावे लागतील.
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शेवटच्या दिवशी भारतीय संघाने यजमान संघाला 324 धावांवर सर्वबाद करत 188 धावांनी विजय नोंदवला. या विजयामुळे भारताला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत फायदा मिळाला आहे. बांगलादेेशविरुद्धच्या या विजयामुळे भारत गुणतालिकेच्या दुसऱ्या स्थानावर पोहोचला. भारताने या वर्षी खेळलेल्या 13 कसोटी सामन्यापैकी 7 सामन्यात विजय मिळवला, तर 4 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आणि 2 सामने अनिर्णित राहिले. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंकतालिकेत भारतीय संघाचे 87 गुण आणि विजयाची टक्केवारी 55.77 अशी आहे.
सध्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतलिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी खेळलेल्या 13 सामन्यापैकी 9 सामन्यात त्यांना विजय मिळाला, तर फक्त एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यांची विजयाची टक्केवारी 76.92 इतकी आहे आणि ते गुणतालिकेत शीर्ष स्थानावर आहेत.
बांगलादेश विरुद्ध खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांगलादेश संघाला विजयासाठी 241 धावांची गरज होती आणि 4 गडी शिल्लक होते. भारताने पहिल्याच सत्रात चारही गडी बाद करत बांगलादेश संघाला पराभवाची धुळ चारत टी20 आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा वचपा काढला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या कसोटीत टीम इंडियाच निघाली ‘शेर’, बांगलादेशला 188 धावांनी चारली धूळ
FIFA WC 2022: आक्रमक क्रोएशिया मोरोक्कोवर भारी, तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात थरारक विजय