---Advertisement---

‘डीके ऑन टूर!’ कॉमेंट्री बॉक्समधून बाहेर पडत दिनेशने लंडनमध्ये चालवली अनोखी स्कूटर; व्हिडिओ व्हायरल

On: शुक्रवार, ऑगस्ट 6, 2021 9:03 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या इंग्लंडमध्ये आहे. दिनेश कार्तिक सध्या मैदानावर कमी व मैदानाच्या बाहेर जास्त दिसत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान समालोचन करताना दिसला होता. आता तो इंग्लंडमध्ये समालोचनाचा आनंद घेताना दिसून येत आहे. त्याचबरोबर दिनेशचा हा अंदाज सर्व क्रिकेटप्रेमींना देखील आवडत आहे.

दिनेश कार्तिक फक्त इंग्लंडमधील क्रिकेट मैदानावर कॉमेंट्रीचा आनंद घेत नाही, तर तो लंडनच्या रस्त्यांवर फिरण्याचाही आनंद घेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता, ज्यात दिनेश नॉटिंगहॅममध्ये मिनी स्कूटर चालवताना दिसून आला होता. परंतु ही स्कूटर भारतात चालणाऱ्या सामान्य स्कूटरसारखी नाही. तो पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानाबाहेर असे काही करताना दिसून आला आहे.

भारत आणि इंग्लंड संघात सुरू आलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दिनेश कार्तिक स्कूटर चालवताना दिसून आला. हा व्हिडिओ स्काय स्पोर्ट्सने पोस्ट केला होता. त्याचबरोबर त्यांनी लिहिले की, “डीके ऑन टूर.”

दिनेश कार्तिकनेही या अगोदर या स्कूटरच्या राईडसाठी आपली उत्सुकता व्यक्त केली होती आणि सांगितले होते की, तो याआधी भारतीय संघासोबतच्या सामन्यांसाठी नॉटिंगहॅमला आला आहे. पण पहिल्यांदाच तो येथे समालोचन करण्यासाठी आला आहे. त्याचबरोबर दिनेश कार्तिक म्हणाला की, एक खेळाडू म्हणून त्याने या बाईकचा कधीच आनंद घेतला नाही, त्यामुळे आता त्याला संधी मिळत असताना त्याला त्याचा आनंद घ्यायचा आहे.

त्याचबरोबर कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर भारतीय संघाने इंग्लंड संघाचा पहिला डाव १८३ धावांवर रोखला. यामध्ये जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ गडी बाद केले. दुसरीकडे भारतीय संघाचा पहिला डाव २७८ धावांवर संपुष्टात आला. यावेळी भारताने ९५ धावांची आघाडी घेतली होती.

महत्वाच्या बातम्या-

-ENG vs IND, 1st Test, 3rd Day: रॉबिन्सनच्या चेंडूवर रिषभ पंत झेलबाद, भारताच्या ५ बाद १४५ धावा

-खेलरत्न पुरस्कारानंतर आता नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे नाव बदलण्याची होतेय मागणी

-अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---