---Advertisement---

खुशखबर! कोरोनाला धोबी पछाड देत रिषभ पंत टीम इंडियात दाखल; फोटो व्हायरल

On: गुरूवार, जुलै 22, 2021 1:34 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात येत्या ४ ऑगस्टपासून कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या सामन्याची तयारी म्हणून भारतीय संघ काउंटी सिलेक्ट इलेव्हेन संघाविरुद्ध सराव सामना खेळण्यात व्यस्त आहे. यादरम्यान भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना २० दिवसांची सुटी देण्यात आली होती. या दरम्यान भारतीय संघातील खेळाडू मौज मजा करताना दिसून आले होते. याचा जबरदस्त फटका भारतीय संघाला बसला होता. भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला कोरोनाची लागण झाली होती. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु, आता आनंदाची बातमी समोर आली आहे. रिषभ पंत ठीक होऊन भारतीय संघाशी पुन्हा एकदा जोडला गेला आहे.(Indian Wicketkeeper Batsman Rishabh pant joins Indian team,after tested negative)

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर रिषभ पंतचा फोटो शेअर करत लिहिले की,”हॅलो रिषभ,तुला पुन्हा एकदा पाहून बरे वाटले.”

माध्यमातील वृत्तानुसार, कोरोनाची दुसरी लस घेण्यापूर्वी रिषभ पंत डेंटिस्टकडे गेला होता, जिथे त्याला कोरोनाचे संक्रमण झाले असण्याची दाट शक्यता आहे. तसेच, सुटीदरम्यान तो युरो कपमधील इंग्लंड विरुद्ध जर्मनी यांच्यातील सामना पाहण्यासाठी देखील गेला होता.

रिषभ पंत २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो. इंग्लंड संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना ४ ऑगस्ट पासून नॉटिंघममध्ये खेळला जाणार आहे.

इंग्लंड संघाविरुद्धची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर

महत्त्वाच्या बातम्या – 

दांडीगुल गोलंदाजीचा शेर! क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात न्यूझीलंडचा सर्वोत्तम गोलंदाज बनलेला ‘ट्रेंट बोल्ट’

मुरलीधरनने बरोबर ११ वर्षांपूर्वी घेतली होती ‘ऐतिहासिक’ निवृत्ती; इतिहासात कायमसाठी सुवर्णाक्षरांनी नोंदवले होते नाव

Video: काउंटी संघाकडून खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला भारी ठरला मोहम्मद सिराज, बाउन्सरवर असे केले आऊट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---