यावर्षी झालेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाचा भाग असणाऱ्या हरलीन देओलने मागील वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वर्षभरात तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. हरलीन जितकी उत्कृष्ट मधल्या फळीतील फलंदाज आहे, तितकीच ती चांगली फिरकीपटूही आहे. इतकेच नव्हे तर सुंदरतेच्या बाबतीत ती चांगल्या चांगल्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते.
Ready for evening workouts ? Let’s tweet about your evening time….. pic.twitter.com/uZYZqHhY6d
— Harleen Kaur Deol (@imharleenDeol) April 26, 2020
भारतीय संघात स्थान मिळविणारी हरलीन (Harleen Deol) चंदीगडची दुसरी महिला क्रिकेटपटू आहे. तिने 8 वर्षांच्या वयात भाऊ आणि शेजारी राहणाऱ्या मुलांबरोबर गल्ली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. तसेच, 9 वर्षांच्या वयात तिने शाळेकडून राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटदेखील खेळले. तरीही त्यानंतर 13 वर्षांच्या वयात क्रिकेटसाठी ती हिमाचल प्रदेशला गेली आणि तिथे व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
Lovely memories to carry out from Surat. Clinch the series 3-1 ???????? pic.twitter.com/CAm8okIUEJ
— Harleen Kaur Deol (@imharleenDeol) October 5, 2019
हरलीन अभ्यासात नेहमीच अव्वल राहिली आहे. 10वी आणि 12वी मध्ये तिला 80 टक्के गुण मिळाले होते. हरलीन एक चांगली अभिनेत्रीही आहे. तिचा मोठा भाऊ दातांचा डॉक्टर आहे. 22 वर्षीय हरलीन क्रिकेटव्यतिरिक्त हॉकी, फुटबॉल आणि बास्केटबॉलदेखील खेळत होती. शालेयवयीन काळात ती चांगली ऍथलीट राहिली आहे.
Some old snaps. pic.twitter.com/CFVe55aMLh
— Harleen Kaur Deol (@imharleenDeol) July 5, 2019
हरलीन जेव्हा गल्ली क्रिकेट खेळत होती, तेव्हा नेहमी शेजारी तिच्या आईला म्हणायचे, मुलगी मोठी होत आहे आणि मोठ्या मुलांबरोबर खेळत आहे. परंतु या सर्व गोष्टींचा हरलीनवर काही फरक पडला नाही आणि तिच्या घरच्यांनीही या गोष्टींवर लक्ष दिले नाही.
Back to Pavilion. From #instagram join me here – https://t.co/20T0RarGcu pic.twitter.com/y8wtZq2XJh
— Harleen Kaur Deol (@imharleenDeol) May 15, 2019
हरलीनने भारताकडून आतापर्यंत केवळ 1 वनडे आणि 6 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.